दादर येथील अमर हिंद मंडळातर्फे १८ ते २८ एप्रिल या कालावधीत वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी ‘लोकशाहीचे भवितव्य’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. यात अरविंद गोखले, संदीप प्रधान, अरुणा पेंडसे हे सहभागी होणार असून सूत्रसंचालन पत्रकार प्रसाद मोकाशी करणार आहेत. व्याख्यानमालेतील अन्य विषय, वक्ते पुढीलप्रमाणे

१९ एप्रिल-मुलुखावेगळी माणसे (सुधीर गाडगीळ), २० एप्रिल- भारतातील गरिबी (नीलकंठ रथ), २१ एप्रिल- आगरकरांचा विवेकवाद (रझिया पटेल), २५ एप्रिल- मुंबईचे आरोग्य (ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य), २६ एप्रिल- झाले उन्हाचे चांदणे (ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर), २७ एप्रिल-लय, ताल आणि नाटय़ (ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. विजया मेहता), २८ एप्रिल- माझी संगीतयात्रा (मंजिरी अळेगावकर).

व्याख्यानमालेतील सर्व व्याख्याने दररोज सायंकाळी ७.०० वाजता सुरू होतील. दादर (पश्चिम), गोखले मार्ग (उत्तर) येथे अमर हिंद मंडळाच्या पटांगणात होणाऱ्या या व्याख्यानांसाठी सर्वाना विनामूल्य प्रवेश आहे.