20 October 2020

News Flash

एनडीए गुणवत्ता यादीत अनंत देशमुख

शहरातील अनंत देशमुखने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) गुणवत्ता यादीत ५८ वा क्रमांक मिळविल्याने काँग्रेस शहराध्यक्षा अश्विनी बोरस्ते यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.

| June 14, 2014 07:32 am

शहरातील अनंत देशमुखने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) गुणवत्ता यादीत ५८ वा क्रमांक मिळविल्याने काँग्रेस शहराध्यक्षा अश्विनी बोरस्ते यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
अनंतने सेंट झेवियर्स शाळेत आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. नंतर औरंगाबाद येथे सव्‍‌र्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिटय़ूटमध्ये एनडीएची पूर्वतयारी केली. या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्रातून केवळ ५० विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, मुलाखत हे सर्व टप्पे पार केल्यानंतर त्याची एनडीएसाठी निवड झाली. त्याच्या पुढील कारकीर्दीसाठी बोरस्ते यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी नाशिकरोडचे सतीश मंडलेचा, प्रकाश नाईक, प्रसाद जामखिंडीकर, अजीत बने आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2014 7:32 am

Web Title: anant deshmukh in nda rankers list
टॅग Nashik,Nda
Next Stories
1 विद्यापीठातर्फे आरोग्यविषयक जनप्रबोधन
2 राज्य नाटय़ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्या पारितोषिक वितरण
3 नको ‘एलबीटी’.. नको जकात.. व्हॅटमध्ये लावा अधिभार
Just Now!
X