महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे पार पडलेल्या ५३व्या राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेत ‘अंधारयात्रा’ नाटकाने २० हजार रुपयांचे पहिले पारितोषिक पटकावले. या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. औरंगाबाद केंद्रातून मराठवाडा साहित्य परिषदेने हे नाटक सादर केले. गेल्या २० नोव्हेंबर ते १ डिसेंबरदरम्यान झालेल्या या नाटय़ स्पर्धेत एकूण १३ नाटय़प्रयोग सादर करण्यात आले.
स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे औरंगाबाद केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे : दुसरा क्रमांक – ‘यातला विनोदी गांभीर्याने घ्या’- गाथा बहुद्देशीय संस्था (१५ हजार रुपये), तिसरा क्रमांक- ‘उसनी बायको पाहिजे’- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संगीत विभाग (१० हजार रुपये).
दिग्दर्शन- प्रथम पारितोषिक (१० हजार रुपये)- रमाकांत भालेराव (अंधारयात्रा), दुसरे (५ हजार रुपये)- विजय क्षीरसागर (यातला विनोद गांभीर्याने घ्या); नेपथ्य- प्रथम पारितोषिक (५ हजार रुपये)- विजय क्षीरसागर (यातला विनोद गांभीर्याने घ्या), दुसरे (३ हजार रुपये)- नीता ईप्पर (काळोख देत हुंकार); प्रकाश योजना- प्रथम पारितोषिक (५ हजार रुपये)- युवराज साळवे (अंधारयात्रा), दुसरे (३ हजार रुपये)- अशोक बंडगर (तंटय़ा भिल्ल); रंगभूषा- प्रथम पारितोषिक (५ हजार रुपये)- श्वेता मांडे (विदाउट संबळ स्वर्गात गोंधळ), दुसरे (३ हजार रुपये)- वैशाली मदनकार (काळोख देत हुंकार); उत्कृष्ट अभिनय- रौप्यपदक व ३ हजार रुपये- रोहित देशमुख (अंधारयात्रा) व प्रियंका गजभिये (नाटक चाहूल).
अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे- श्वेता पत्की, कोमल सोनारे, पुष्पा गायकवाड, सारिका ढोके, विनीत भोंडे, तेजस वीसपुते, सिद्धेश्वर थोरात, रूपेश परतवाघ या कलाकारांना देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून गुरू वठारे, दिलीप अलोणे, विनिता पिंपळखरे यांनी काम पाहिले.