जिल्ह्य़ातील ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन करून जि. प. प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
ग्रामरोजगार सेवकांचे झालेल्या कामाचे थकीत मानधन त्वरित देणे, कामावरून बेकायदा कमी केलेल्या ग्रामरोजगार सेवकांना परत कामावर घेण्याचे आदेश देणे, पूर्णकालीन क र्मचारी मानून दरमहाचे इतर राज्याप्रमाणे वेतन निश्चित करणे आदी विविध १६ मागण्या केल्या आहेत. धरणे आंदोलनात शंभरावर मंडळींचा सहभाग होता.