News Flash

स्वच्छतामित्र वक्तृत्व स्पध्रेत अंजली जिल्ह्य़ातून द्वितीय

शासनाचा पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या स्वच्छता मित्र वक्तृत्व स्पध्रेत मे.ए.सो.क निष्ठ महाविद्यालयाची अंजली वऱ्हाडे तालुक्यातून प्रथम व

| January 11, 2013 02:38 am

शासनाचा पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या स्वच्छता मित्र वक्तृत्व स्पध्रेत मे.ए.सो.क निष्ठ महाविद्यालयाची अंजली वऱ्हाडे तालुक्यातून प्रथम व जिल्ह्य़ातून द्वितीय आली आहे.
ही स्पर्धा-२०१२ चे २४ डिसेंबर २०१२ रोजी घेण्यात आली होती. मेहकर येथील पंचायत समितीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या स्पध्रेत अंजली दिगंबर वऱ्हाडे हिने आपल्या वक्तृत्व शैलीने प्रेक्षक व परीक्षकांची मने जिंकत प्रभावीपणे विषय मांडून विजयश्री खेचून आणली. मे.ए.सो.ज्यु. कॉलेजची यशाची परंपरा कायम ठेवत तिने संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या स्पध्रेचा निकाल जाहीर झाल्यानंतर ५ जानेवारी रोजी मेहकर येथील पंचायत समिती येथे बक्षीस वितरण सोहळ्यात सभापती अंजली माळोकार यांच्या हस्ते ५००० रुपयाचा धनादेश, शासनाचे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन तिला गौरविण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2013 2:38 am

Web Title: anjali came second from distrect in cleanfriend speech competiton
Next Stories
1 दुरावलेली माणसं’कादंबरीचे प्रकाशन
2 पुनर्रचित चंद्रपूर वनविभाग कार्यालयाचे उद्घाटन
3 विदर्भातील साखर कारखान्यांची अवस्था दयनीय