06 August 2020

News Flash

अंकुर मराठी साहित्य संमेलन २४, २५ नोव्हेंबरला कराडमध्ये

दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीवर्षांनिमित्त २४ व २५ नोव्हेंबरला येथे होणाऱ्या ५१ व्या अंकुर मराठी साहित्य संमेलनात परिसंवाद, कथाकथन व काव्य मैफलीसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन

| November 21, 2012 03:55 am

दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीवर्षांनिमित्त २४ व २५ नोव्हेंबरला येथे होणाऱ्या ५१ व्या अंकुर मराठी साहित्य संमेलनात परिसंवाद, कथाकथन व काव्य मैफलीसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रमुख संयोजक जागृती सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा विजया पाटील यांनी दिली.  
अंकुर साहित्य संघाची सातारा शाखा व कराडच्या जागृती सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानतर्फे २४ व २५ रोजी हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. २४ रोजी सकाळी १० वाजता डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. संमेलनाच्या अध्यक्षा शुभांगी बडबडे, स्वागताध्यक्ष सत्यनारायण मिणीयार आदी उपस्थित राहतील. दुपारी २ वाजता मान्यवरांच्या पुस्तकांचे प्रकाशन तसेच विविध पुरस्कारांचे वितरण होईल. सदानंद शिनगारे, सुरेश पाचकवडे यांच्या उपस्थितीत व नांदेड येथील प्रा. पृथ्वीराज तोर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होईल. सायंकाळी ४ वा विडंबन गीतांचा एकपात्री ‘कोटी कोटीनं खाऊ नका’ हा कार्यक्रम होईल. कोल्हापूर येथील प्रा. मधुकर महाजन हे कार्यक्रम सादर करतील. सायंकाळी ५ वाजता ‘मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी मराठी साहितय संमेलने गरजेची आहेत का?’ या विषयांवर परिसंवाद होईल. सातारचे डॉ. राजेंद्र माने अध्यक्षस्थानी असतील. शुभांगी गान, शोभा रोकडे, डॉ. ज. पा. खोडके, प्रा. मधुकर वडोदे, रोहिदास पोटे हे त्यात सहभागी असतील. रात्री आठ वाजता दिलीप खन्ना यांचा ‘हास्यदरबार’ हा कार्यक्रम होईल. साडेआठ वाजता ‘चला कवितेच्या बनात’ हे कविसंमेलन होईल. पंढरीनाथ रेडकर अध्यक्षस्थानी राहतील. राजा मंगसुळीकर, सूर्यकांत मालुसरे, चित्रा क्षीरसागर यांच्या उपस्थितीत हे संमेलन होईल.
२५ रोजी सकाळी नऊ वाजता डॉ. रमेशकुमार गवळी पथनाटय़ सादर करतील. १० वाजता प्रसिद्ध कवी लहू कानडे यांची प्रकट मुलाखत होईल. ११ वाजता ‘महाराष्ट्राच्या साहित्यिक क्षेत्रात यशवंतरावांचे योगदान’ या विषयावर परिसंवाद होईल. पुणे येथील शहा फरांदे अध्यक्षस्थानी असतील. प्रा. पी. बी. पाटील, गणपतराव कणसे, जोतिराम पवार, शहाजीराव पाटील, डॉ. सहदेव चौगुले, डॉ. रा. गो. प्रभुणे, प्रा. अनंत सुर, प्रा. दत्तात्रय डुंबरे, प्रदीप पाटील हे त्यात सहभागी होतील. दुपारी एक वाजता दिगंबर गाडगे यांचा नकलांचा ‘हास्यरंजन’ कार्यक्रम होईल. दुपारी दीड वाजता कवयित्री फरझाना इक्बाल यांचा सत्य अनुभवले काव्यात हा कार्यक्रम होईल.
दुपारी दोनला कथाकथन होईल. डॉ. रमा मराठे यांच्या अध्यक्षतेखाली व श्रीमती कल्पना बांदेकर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात विविध वक्ते सहभागी होतील. दुपारी चारला ‘क कवितेचा’ हा कार्यक्रम होईल. संजय घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली व रमझान मुल्ला, संजीवनी तोफखानी, प्राचार्य श्रीरंग शेंडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल.
सायंकाळी सहा वाजता वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचा समारोप होईल. या वेळी निवृत्ती गवारे, यशवंतभाऊ भोसले, हेमंत कुलकर्णी, रोहिणी कल्याणी यांची उपस्थिती राहील.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2012 3:55 am

Web Title: ankur marathi editorial annual meet is on 2425 november in karad
टॅग Karad
Next Stories
1 गारठा ७.९ अंशांचा..
2 ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी अरूण डोंगळे
3 अमेरिका दौऱ्यावरून आयुक्त परतले
Just Now!
X