26 February 2021

News Flash

भारतीय कृषक समाजाचा उद्या मेळावा

देशाचे पहिले कृषिमंत्री व भारतीय कृषक समाज संस्थेचे संस्थापक डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (दि. २७) नगरमध्ये सहकार सभागृहात कृषक मेळावा आयोजित करण्यात आला

| December 25, 2012 03:11 am

देशाचे पहिले कृषिमंत्री व भारतीय कृषक समाज संस्थेचे संस्थापक डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (दि. २७) नगरमध्ये सहकार सभागृहात कृषक मेळावा आयोजित करण्यात आला असून यावेळी संस्थेच्या वतीने शेतकरी हितासाठी विषेश योगदान देणाऱ्यांना ‘कृषी जीवन गौरव’ व पारंपरिक शेतीला छेद देऊन, वेगळे प्रयोग करुन उत्पादन वाढ व पुरक यशस्वी व्यवसाय करणाऱ्यांना ‘कृषीरत्न’ पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.
संस्थेचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब भोसले व सचिव अंकुश कानडे यांनी ही माहिती दिली. मेळावा सकाळी १० वाजता होईल.
श्री. बुधाजीराव मुळीक, आ. यशवंतराव गडाख, माजी कृषिमंत्री रणजित देशमुख, राष्ट्रीय लिंबू उत्पादक संघाचे अध्यक्ष डॉ. अप्पासाहेब भुजबळ आदींना कृषी जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. कार्यक्रमास संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. कृष्णबीर चौधरी, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, पालकमंत्री बबनराव पाचपुते, माजी मंत्री गोविंदराव आदिक, जि. प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, खासदार दिलीप गांधी व भाऊसाहेब वाकचौरे, तसेच सर्व पक्षांचे आमदार, ज्येष्ठ नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2012 3:11 am

Web Title: annal of indian farming samaj
Next Stories
1 मुरकुटेंचा श्रीरामपूरमध्ये ससाणे-कांबळेंना धक्का
2 जनगणनेच्या मानधनापासून शिक्षक वंचित
3 माध्यमिक शिक्षक संघाच्या संकेतस्थळाची निर्मिती
Just Now!
X