News Flash

आणखी दोन उपकुलसचिवांची चौकशी?

पुनर्मूल्यांकन गुणवाढ प्रकरणामुळे पुणे विद्यापीठातील सर्वच विभागांमधील कर्मचारी गेले काही दिवस धास्तावले असून आणखी दोन उपकुलसचिवांची पोलिसांनी चौकशी केल्याची कुजबुज बुधवारी विद्यापीठामध्ये होती.

| January 17, 2013 04:01 am

पुनर्मूल्यांकन गुणवाढ प्रकरणामुळे पुणे विद्यापीठातील सर्वच विभागांमधील कर्मचारी गेले काही दिवस धास्तावले असून आणखी दोन उपकुलसचिवांची पोलिसांनी चौकशी केल्याची कुजबुज बुधवारी विद्यापीठामध्ये होती.
पुणे विद्यापीठाचे कामकाज बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे सुरू झाले. पुनर्मूल्यांकन प्रकरणामुळे निर्माण झालेला ताण थोडासा निवळल्यामुळे रोजच्या कामांनी थोडी गती घेतली होती. दोन दिवसांपूर्वी अटक केलेल्या अधिकाऱ्यांना बुधवारी पुन्हा कोर्टात हजर केले जाणार असल्यामुळे पुढे काय, ही उत्सुकता होती. दुपारी साधारण एक वाजल्याच्या सुमारास अचानक विद्यापीठामध्ये थोडीशी खळबळ झाली. दोन उपकुलसचिवांना पोलिसांनी चौकशीसाठी नेल्याची कुजबुज विद्यापीठामध्ये सुरू झाली. त्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये इतर विभागांमधून ‘जागेवर आहेत का? आज आलेत का?’ अशी विचारणा होऊ लागली. सर्व विभागांमध्ये पुन्हा कुजबुज सुरू झाली. संध्याकाळपर्यंत विद्यापीठामध्ये तणावाचे वातावरण होते.
गेले काही दिवस पुनर्मूल्यांकन प्रकरणाबाबत झपाटय़ाने घडणाऱ्या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर कर्मचारी धास्तावले आहेत. परीक्षा विभागांमध्ये सध्या काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांबरोबर यापूर्वी काम करणारे कर्मचारीही सध्या घाबरलेले आहेत. या प्रकरणामध्ये आता पुढे आणखी कोणाचे नाव येणार, अजून कुणाला चौकशीला सामोरे जावे लागणार अशा चिंतेत सध्या परीक्षा विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 4:01 am

Web Title: another two officers inquiery
Next Stories
1 स्थायी समितीमधील ‘कुस्तीत’सत्ताधारी राष्ट्रवादीचा पराभव
2 अण्णा भाऊंच्या ‘फकिरा’ कादंबरीवर लवकरच चित्रपट – डॉ. अमोल कोल्हे
3 आरटीओने जप्त केलेल्या वाहनांचा २२ जानेवारीला लिलाव
Just Now!
X