राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी लेखक/प्रकाशकांनी अर्ज करण्याचे तसेच पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २०१२-१३ या वर्षांसाठीच्या पुरस्कारांसाठी हे अर्ज करायचे आहेत. १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या पहिल्या आवृत्तीचा पुरस्कारांसाठी विचार केला जाणार आहे. पुरस्कारांसाठीची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, रवींद्र नाटय़ मंदिर इमारत, दुसरा मजला, प्रभादेवी, दादर (पश्चिम), मुंबई- येथे किंवा मुंबई वगळता इतर जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात (सर्वसाधारण शाखा/करमणूक शाखा) येथे विनामूल्य उपलब्ध आहेत.  प्रवेशिका साहित्य व संस्कृती मंडळाच्या कार्यालयात आणि इतर जिल्ह्यातील लेखक/प्रकाशकांनी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये १० जून ते १० जुलै २०१३ या कालावधीत पाठवाव्यात.