22 September 2020

News Flash

कोयना भूकंपबाधितांच्या आराखडय़ास मान्यता

कोयना भूकंपामुळे बाधित झालेल्या महाबळेश्वर तालुक्यातील गावांच्या सहा कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या आराखडय़ास व अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता देऊन या कामांचे प्रस्ताव तातडीने भूकंप पुनर्वसन समितीकडे

| November 28, 2013 01:37 am

कोयना भूकंपामुळे बाधित झालेल्या महाबळेश्वर तालुक्यातील गावांच्या सहा कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या आराखडय़ास व अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता देऊन या कामांचे प्रस्ताव तातडीने भूकंप पुनर्वसन समितीकडे सादर करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहीती आमदार मकरंद पाटील यांनी दिली.
याबाबत मकरंद पाटील म्हणाले, ‘‘ कोयना भूकपांमुळे बाधित झालेल्या महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील जनतेची बऱ्याच वर्षांची प्रलंबित विकासकामे मार्गी लागणार आहेत. दुर्गम भागातील जनतेला गावातील विकासकामांच्या सोयी सुविधा उपलब्ध होणार असून, त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे.’’
 या निधीतून राजपुरी, िखगर, दानवली, भिलरेंज माध्यमिक हायस्कूल भिलार, रेणोशी भेकवली,  भिमनगर, मांघर, दरे, तांब, गोगवे, पिपरी, लाखवड कुरेशी, सौदरी सुतावस्ती, आचली, चिखली, महारोळे, वारसोळी, आडाळे, रुळे, घाघलवाडी, गाढवली, उत्तेवेश्वर, माचुतर, भिलार, नाकीदा, एरंडल, दुधाशी, धवरी, देवळी, चतुरबेट घोणसपूर, कुभरोशी, दुधगाव मांगर, वेळानूर, पार रामवरदायीनी, चिखली मालुसर आदी गावात समाजमंदिर, ग्रामपंचायत कार्यालय, व्यायामशाळा इमारत, गावपोहोच रस्ते, स्मशानभूमी, रस्ते, सामाजिक सभागृह, अतंर्गत रस्ते, संरक्षक िभत बांधणे, रस्ता डांबरीकरण आदी विकास कामांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2013 1:37 am

Web Title: approval koyna earthquake addict outline
टॅग Koyna,Wai
Next Stories
1 कुकडी आवर्तनातून सीनात पाण्याची मागणी
2 बालेकिल्ल्यातच शिवसेनेची पीछेहाट!
3 सांगलीत चक्काजाम आंदोलन; वाहतूक व्यवस्था कोलमडली
Just Now!
X