छत्रपती शाहूमहाराज शिक्षण संस्थेच्या छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयास केंद्र व राज्य सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रणजित मुळे यांनी दिली.
पैठण रस्त्यावरील कांचनवाडीत असलेल्या या महाविद्यालयात ३०० प्रवेश क्षमतेस मान्यता देण्यात आली. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मेकॅनिकल १२० जागा, इलेक्ट्रिकल ६० जागा, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन ६० जागा, तसेच कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग ६० जागांची मान्यता दिली. महाविद्यालयात विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय नियतकालिकांसह सुसज्ज ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा, लँग्वेज लॅब, कॉम्प्युटर लॅब, सभागृह, खुला मंच, स्वतंत्र अभ्यासिका, क्रीडांगण, बस आदी सुविधा आहेत. २०१३-१४ या शैक्षणिक वर्षांपासून सुरू होणाऱ्या या महाविद्यालयांमध्ये चांगल्या गुणवत्तेचे शिक्षण देऊ, असे अध्यक्ष रणजित मुळे, सचिव पद्माकर मुळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव लहाने, समीर मुळे, नितीन बागवे यांनी सांगितले.