पुणे महामार्गावर शहर हद्दीत केगाव येथे चौघा चोरटय़ांनी घरात घुसून शस्त्रांचा धाक दाखवत पावणे दोन लाखांचा ऐवज लुटून नेल्याची घटना मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास घडली. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद झाली आहे.
दीपक ज्ञानदेव दळवी यांनी या संदर्भात दिलेल्या फिर्यादीनुसार पहाटे चार चोरटे दळवी यांच्या घरात घुसले. त्यावेळी झोपलेल्या दळवी कुटुंबीयास चोरटयांनी झोपेतून उठवून दंडुका व स्क्रु ड्रायव्हरचा धाक दाखवून दहशत निर्माण केली. त्या वेळी घाबरलेल्या महिलांनी अंगावरील सोन्याचे दागिने चोरटयांना दिले. चोरटय़ांनी घरात कपाटातील आठ तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व अन्य ऐवजासह एक लाख ७८ हजारांचा ऐवज बळजबरीने लुटून पोबारा केला. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची माहिती मिळताच पोलीस अधिकारी तसेच ठसे तज्ज्ञ व श्वानपथक दळवी यांच्या घरात दाखल झाले. परंतु श्वानपथकाचा फायदा होऊ शकला नाही. पोलीस निरीक्षक अरूण वायकर हे पुढील तपास करीत आहेत.
विवाहितेचा खून
एका २४ वर्षांच्या विवाहितेला विहिरीत ढकलून देऊन तिचा खून केल्याप्रकरणी तिघा जणांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वैशाली संजय चौगुले (रा. साठे-पाटील वस्ती, देगाव रोड, सोलापूर) असे दुर्दैवी मृत विवाहितेचे नाव आहे. ती अकरा दिवसापूर्वी घरातून बेपत्ता झाली होती. याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. दरम्यान, अखेर जुनी मिल आवारातील विहिरीत वैशाली चौगुले हिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. हा खुनाचा प्रकार असून तिचा भाऊ अमर जगन्नाथ कवडे (रा. जुनी मिल चाळ, मुरारजी पेठ, सोलापूर) याने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी सुधीर शिंदे, त्याचा भाऊ सतीश िशदे व त्यांची आई या तिघा जणांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुधीर िशदे व सतीश िशदे यांनी क्षुल्लक कारणावरून मृत वैशाली चौगुले हिला धमकावले होते. ‘तू अध्र्या तासात आमच्या घरी ये, अन्यथा, तुझ्या घरी येऊन नव-याला सर्व प्रकार सांगू’ अशा शब्दात तिला धमकावण्यात आल्यानंतर ती त्याच दिवसापासून गायब झाली होती. सुधीर िशदे, सतीश िशदे व त्यांच्या आईने वैशाली हिचे अपहरण करून तिचा खून केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.