ठाणे जिल्ह्य़ातील प्रयोगशील शाळा, शासकीय आस्थापना, औद्योगिक संघटना आणि सामाजिक संस्थांना जिल्हा विकासातील त्यांचे योगदान आणि भविष्यातील योजना मांडण्याची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने यंदाही ‘समर्थ ठाणे निर्धार परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या परिषदेचे दुसरे वर्ष आहे.
या परिषदेअंतर्गत शहरातील व्यक्ती, संस्था आणि संघटनांना जिल्हा विकासासंदर्भात आपले प्रकल्प आणि योजना या परिषदेत मांडता येणार आहेत. या वर्षांसाठी स्टॉल्सची नोंदणी सुरू झाली असून इच्छुकांना १५ मेपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या परिषदेत जिल्हा विकासकावर आधारित परिसंवाद तसेच ठाण्यातील कलावंतांचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क – २५४५४६४४ / ९९८७०३०९१६.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 7, 2013 2:31 am