26 February 2021

News Flash

अशोका युनिव्हर्सल आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत विजेते

अशोका युनिव्हर्सल (वडाळा) संघाने रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलचा १३ धावांनी पराभव करत येथे आयोजित रासबिहारी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.

| December 25, 2012 01:39 am

अशोका युनिव्हर्सल (वडाळा) संघाने रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलचा १३ धावांनी पराभव करत येथे आयोजित रासबिहारी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.
रासबिहारी स्कूलच्या वतीने आणि जिल्हा क्रिकेट संघटनेच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा विभागाचे उपसंचालक जगन्नाथ अधाने, जिल्हा क्रीडा अधिकारी सुधीर मोरे, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव समीर रकटे, रासबिहारी स्कूलच्या विश्वस्त सुचित्रा सारडा, प्राचार्य बिंदू विजयकुमार आदी उपस्थित होते. रासबिहारी स्कूलचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे उद्गार मान्यवरांनी काढले.
याप्रसंगी विजेता अशोका व रासबिहारी या संघांसह मालिकावीर म्हणून अनिरुद्ध पवार, सर्वोत्कृष्ट गोलंदाज कुणाल राठोड, फलंदाज केतन टंख यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या अनुष्का सराफ व दुर्वा गांधी यांनी केले. तर उपस्थितांचे  आभार वेदांत गायकवाड यांनी मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2012 1:39 am

Web Title: ashoka universal wins the inter school cricket competition
टॅग : Sports
Next Stories
1 शिवसेनेला आताच जैन यांची आठवण का, नरेंद्र पाटील यांचा सवाल
2 इतिहास हा संस्कार घडविणारा विषय- आमदार शिरीष चौधरी
3 ‘ऑनलाईन’ दस्त नोंदणीची प्रक्रिया सतत ‘ऑफलाईन’
Just Now!
X