03 December 2020

News Flash

थमॉकोलच्या मखरांचे आकर्षण कायम

गणपती बाप्पांच्या दहा दिवसांच्या मुक्कामासाठी नेत्रदीपक सजावट करण्याकडे बहुतेकांनी लक्ष केंद्रीत केले आहे. बाजारपेठा विविध आकारातील थमॉकोलची मंदिरे, मखर, सिंहासने आदी सजावटीच्या साहित्याने सजल्याचे दिसत

| September 7, 2013 12:37 pm

गणपती बाप्पांच्या दहा दिवसांच्या मुक्कामासाठी नेत्रदीपक सजावट करण्याकडे बहुतेकांनी लक्ष केंद्रीत केले आहे. बाजारपेठा विविध आकारातील थमॉकोलची मंदिरे, मखर, सिंहासने आदी सजावटीच्या साहित्याने सजल्याचे दिसत आहे. गत वर्षीच्या तुलनेत थर्माकोलच्या किंमतीत काही अंशी झालेली वाढ आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने जनजागृती .. यामुळे थमॉकोलच्या या सजावट साहित्य खरेदीला गणेशभक्तांचा संमिश्र प्रतिसाद लाभल्याची विक्रेत्यांची भावना आहे.
गणेशोत्सवासाठी शहरातील लहान-मोठय़ा अशा सर्वच मंडळांची लगबग सुरू असताना घरातही सजावटीची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
आकर्षक सजावट करताना थमॉकोलच्या साधनांची मागणी वाढत आहे. ग्राहकांची पसंती लक्षात घेऊन थमॉकोलच्या विविध आकारातील गणेश मंदिरे, देव-देवतांची सिंहासने, दरबार आदी प्रकारात मखरे तयार केली जात आहे. शहरात काही ठिकाणी जाड थमॉकोलवर ‘कावर्ि्हग’ची कामे करत जाळी व घुमट अशी कोरीव कामेही करण्यात येत आहे. थमॉकोलच्या साहित्यात गतवर्षीच्या तुलनेत साधारणत: २० टक्के वाढ झाली आहे. इंधन दरवाढीचा परिणाम वाहतूक खर्चात वाढ होण्यात झाला.
सध्या बाजारात मयुरासन, तुळजाभवानी गाभारा, अष्टविनायक महिरप, साई सिंहासन, बाळासाहेब ठाकरे यांचे आसन, केकच्या आकारातील विविध मखरे उपलब्ध
आहेत. मोठा झुला मंदिरास ग्राहकांची पसंती लाभली आहे. चार फूट लांब व दोन फूट रुंद अशा थमॉकॉलच्या मंदिरात सिंहासनाला झोपाळ्याचे रुप दिले आहे. रंगकाज धातू रंगांप्रमाणे असल्याने मंदिर थमॉकॉल की धातुचे असा पाहणाऱ्याला प्रश्न पडतो. या मंदिराची किंमत साडे तीन हजारांपासून ते १३ हजार रुपयांपर्यंत आहे.
मंदिराच्या वाढलेल्या किंमती पाहून अनेकांचा घरीच मंदिरे तयार करण्याकडे कल आहे. सर्वात कमी जाडीचे थमॉकोल  शीटची किंमत १० रुपये तर ६, ८ आणि १० फुटांचे थमॉकॉलचे विविध नक्षीदार खांब हे साधारणत: त्यांच्या जाडीनुसार २० ते
अडीच हजार रुपये प्रती नग असे उपलब्ध आहेत. या शिवाय द्वारपाल, उंदीर मामा, मूर्तीच्या मागे फिरणारे चक्र आदींचे ‘कटआऊट’ साधारणत: ४० रुपयांपासून उपलब्ध आहेत.
मंदिरांच्या विविध प्रकारात सध्या लाकडाच्या मखमली आसनाला ग्राहकांची मागणी आहे. त्यात काही आसनांना आक र्षक विद्युत रोषणाईची सुविधा केली गेली आहे. साडे तीन हजार रुपयांपासून ते १३ हजारांपर्यंत ही आसने उपलब्ध आहेत. एकिकडे मंदिरांच्या वाढलेल्या किंमती आणि दुसरीकडे विविध सामाजिक संस्था, संघटनांकडून पर्यावरणपुरक गणेशोत्सवाचा सुरू असणारा जागर यामुळे थमॉकोल सजावटीच्या साहित्य खरेदीला ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद लाभत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 12:37 pm

Web Title: attraction of thermocol decoration for ganesh festival continue
टॅग Ganesh Festival
Next Stories
1 अपंगांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबईत आंदोलन
2 फेसबुकवर राष्ट्रवादी उपाध्यक्षाची बदनामी
3 शिक्षकांप्रती गौरवातून कृतज्ञता व्यक्त
Just Now!
X