उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने नऊ महिन्यात दुचाकी चारचाकी, अशा ४६५ वाहनांना आकर्षक नंबर वाटप करून २७ लाख ९९ हजारांचे उत्पन्न मिळविले आहे.
आपला भाग्यांक किंवा शुभ आकडा आपण घेतलेल्या वाहनाला मिळावा म्हणून हजारो रुपये मोजण्याची तयारी अनेकजण  ठेवतात. हेच हेरून अनेक वर्षांंपासून आरटीओ कार्यालयाने  आकर्षक नंबर घेण्यासाठी वेगळे शुल्क आकारने सुरू केले आहे.
अशाच प्रकोरे बुलढाणा जिल्ह्य़ात ४६५ वाहनमालकांनी  वेगवेगळे आकर्षक नंबर  घेण्यासाठी गेल्या १ एप्रिल ते ३१ डिसेंबपर्यंत या नऊ महिन्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास २७ लाख ९९ हजार रुपये मोजले आहेत. त्यात ५० हजार खर्च करून दोघांनी, ३० हजार रुपये मोजून एकाने,  २५ हजार रुपये मोजून १५ लोकांनी, १५ हजार रुपयांचे ३१ लोकांनी, १० हजारांचे १४ लोकांनी, साडेसात हजारांचे २१ लोकांनी, ५ हजारांचे १३६ लोकांनी, ४ हजाराचे ४८ लोकांनी, ३ हजारांचे १४२ लोकांनी, तर २ हजारांचे ४८ लोकांनी, अशा ४६५ वाहनधारकांनी वेगवेगळ्या रकमा मोजून आकर्षक नंबर घेतले आहेत. १ एप्रिल ते ३१ डिसेंबर या कालावधीत विविध वाहनांना लावलेल्या टॅक्स व दंडाद्वारे २१ क ोटी ३४ लाख ८ हजार ८४ रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळविले आहे.