औरंगाबादच्या श्रोत्यांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या मागणीची दखल घेत आकाशवाणी केंद्राच्या प्रसारण वेळेत आता अडीच तासांची वाढ करण्यात आली आहे. उद्याच (बुधवार) याची सुरुवात होत आहे.
आकाशवाणीचे कार्यक्रम पहाटे ५ वाजून ५० ते सकाळी १० वाजून २ मिनिटांपर्यंत, दुपारी साडेबारा ते दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी व सायंकाळी ५ वाजून २३ निमिटे ते रात्री ११ वाजून २० मिनिटांपर्यंत तीन टप्प्यांत प्रसारित केले जातात. या प्रसारणांत उद्यापासून बदल होणार आहे. पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी सुरू झालेले प्रसारण दुपारी ३ वाजून २० मिनिटांपर्यंत अखंड चालू राहणार आहे. यात मधला जवळपास अडीच तासांचा खंड संपुष्टात आला आहे. वाढीव प्रसारण वेळेत चित्रपट संगीत व इतर मनोरंजनावर आधारित कार्यक्रम असतील. नव्या पिढीला आवडणाऱ्या आधुनिक गीतांबरोबरच जुनी दुर्मिळ चित्रपट गीते, नाटय़गीते, तसेच भावगीतेही या वाढीव वेळेत श्रोत्यांना ऐकायला मिळू शकतील.