06 July 2020

News Flash

कोल्हापुरात रंगल्या रिक्षा सौंदर्य स्पर्धा

येथे २६ जानेवारीनिमित्त कोल्हापुरात रंगल्या रिक्षा सौंदर्य स्पर्धा. या स्पर्धेत अस्लम कमरुद्दीन शेख (सदर बझार) यांच्या रिक्षाने नवीन गट (एम.एच.०९-जे-७२८६) प्रथम क्रमांक

| January 28, 2014 03:25 am

   येथे २६ जानेवारीनिमित्त कोल्हापुरात रंगल्या रिक्षा सौंदर्य स्पर्धा. या स्पर्धेत अस्लम कमरुद्दीन शेख (सदर बझार) यांच्या रिक्षाने नवीन गट (एम.एच.०९-जे-७२८६) प्रथम क्रमांक पटकावून ७७७७ रुपये व ट्रॉफी पटकावली. तर जुन्या गटात युनूस मुनेर मौलवी (एम.एच.०७-जे-२३५०) यांच्या रिक्षाने प्रथम क्रमांक मिळवून ७७७७ रुपये व ट्रॉफी मिळविली. या स्पर्धेत सातारा, पुणे, गडहिंग्लज व कोल्हापूर येथील रिक्षा सहभागी झाल्या होत्या. याचबरोबर सामाजिक उपक्रम म्हणून अवनी बालगृहातील मुलांना गणवेश वाटप करण्यात आले. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, भाजप जिल्हाध्यक्ष महेश जाधव, नगरसेवक रविकिरण इंगवले, सत्यजित कदम, प्रतिभा टिपुगडे, कदम बजाजचे नीलेश कदम, अल्ट्राटेक सिमेंटचे व्यवस्थापक अभय जिनगे व जितेंद्र जाधव यांच्या उपस्थित पार पडला.     
स्पर्धेचा निकाल याप्रमाणे- नवीन गट- द्वितीय क्रमांक- राजेंद्र शिंदे (कोल्हापूर)रोख ५५५५ व ट्रॉफी, तृतीय क्रमांक- धनाजी पातरूट (कोल्हापूर) रोख ४४४४ व ट्रॉफी, उत्तेजनार्थ- अशोक आदमाने (कोल्हापूर) रोख ३३३३ व ट्रॉफी.    जुना गट- द्वितीय क्रमांक- रमेश सकट (कोल्हापूर) रोख ५५५५ व ट्रॉफी, तृतीय क्रमांक- अनिल गवळी (गडहिंग्लज) रोख ४४४४ व ट्रॉफी, उत्तेजनार्थ- चाँदसाब शेख- रोख ३३३३ व ट्रॉफी. स्पर्धेत रोख स्वरूपात देण्यात आलेली बक्षिसे हेम एजन्सी (अॅपे) व कदम बजाज यांच्याकडून देण्यात आली. तर ट्रॉफी अल्ट्राटेक सिंमेट यांच्याकडून देण्यात आल्या होत्या.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2014 3:25 am

Web Title: auto beauty contest in kolhapur
टॅग Kolhapur
Next Stories
1 पंढरपूरच्या नाटय़ संमेलनापासून राष्ट्रवादीची स्थानिक मंडळी दूर
2 दोन लाखांचा पंढरपुरी बैल आणि तीन लाखांचा मकाऊ पोपट
3 ‘मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न गरजेचे’
Just Now!
X