14 October 2019

News Flash

बुद्धी के बल पर!

मनाची, बुद्धीची एकाग्रता वाढावी, विचारशक्ती, डावपेच ही कौशल्ये विकसित व्हावीत यासाठी बुद्धिबळ हा खेळ महत्त्वाचा मानला जातो. मात्र, दृष्टिहीनांसाठी हा खेळ अनेकदा अडचणीचा ठरतो. बुद्धिबळ

| September 17, 2014 07:09 am

मनाची, बुद्धीची एकाग्रता वाढावी, विचारशक्ती, डावपेच ही कौशल्ये विकसित व्हावीत यासाठी बुद्धिबळ हा खेळ महत्त्वाचा मानला जातो. मात्र, दृष्टिहीनांसाठी हा खेळ अनेकदा अडचणीचा ठरतो. बुद्धिबळ खेळण्याची इच्छा असूनही पटावरील प्यादी सरकवण्यासाठी, चाली रचण्यासाठी त्यांना अनेकदा दुसऱ्यांवर विसंबून राहावे लागते. परंतु दृष्टिहीनांना अगदी सहजगत्या खेळता येईल असा बुद्धिबळपट तयार करण्यात सोमय्या ट्रस्टच्या ‘रिडल’ या संशोधन विभागाला यश आले आहे. ‘ऑटोमेटेड चेस’ असे या बुद्धिबळपटाचे नाव आहे. विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्तीला चालना मिळावी यासाठी सोमय्या ट्रस्टतर्फे ‘रिडल’ सुरू करण्यात आले आहे. या विभागाचे प्रमुख गौरांग शेट्टी यांनी दृष्टिहीनांसाठी उपयुक्त ठरू शकेल असा बुद्धिबळपट तयार करण्याचे आव्हान विद्यार्थ्यांना केले होते. भव्य गोहल, अतुर मेहता व अ‍ॅलन मेंडिस या अभियांत्रिकीच्या तीन विद्यार्थ्यांच्या मेहनतीतून अखेरीस ‘ऑटोमेटेड चेस’ साकारला.
ऑटोमेटेड चेसची वैशिष्टय़े..
प्याद्यांवर ब्रेलचा वापर
हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या विविध कौशल्यांचा वापर
त्यामुळे कोणते प्यादे सरकवले जात आहे हे खेळाडूला समजेल
रचलेला डावपेच योग्य की अयोग्य हेही समजण्यास मदत
प्रतिस्पध्र्याने प्यादी कुठे सरकवली याचीही माहिती आवाजाच्या माध्यमातून समजणार
दृष्टिहीनांना काळे व पांढरे चौकन ओळखता यावेत यासाठी दोन्ही रंगांच्या चौकोनावर विविध प्रकारचे टेक्स्चर
डोळस व्यक्तींसाठी विविध एलईडी रंगांचा वापर
एकटय़ा व्यक्तीलाही खेळता येऊ शकेल
पट इंटरनेटशी जोडल्यास दूरचा प्रतिस्पर्धीही खेळू शकेल

पट विकसित करण्यासाठी ‘रिडल’ने ‘नॅब’चे सहकार्य घेतले. बुद्धिबळाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील असून निधीची तजवीज करण्याचे काम सुरू आहे. दृष्टिहीनांसाठी असलेला हा बुद्धिबळपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. सप्टेंबर अखेरीस रोम येथे होणाऱ्या ‘मेकर्स फेअर’मध्ये या पटाचे सादरीकरण होईल. त्यानंतर न्यूयॉर्कमध्येही सादरीकरणाचा विचार आहे.
गौरांग शेट्टी, विभागप्रमुख, रिडल (सोमय्या ट्रस्ट)

First Published on September 17, 2014 7:09 am

Web Title: automated chess for blinds
टॅग Mumbai 2