अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या शेवगाव शाखेच्या वतीने राज्यस्तरीय नाटय़गौरव पुरस्कारासाठी यंदा सिनेनाटय़ अभिनेते संजय नार्वेकर, नाटय़निर्माते जयंत जातेगावकर व जिल्हा पुरस्कारासाठी राधाकृष्ण कराळे यांची निवड करण्यात आली आहे.
संस्थेचे अध्यक्ष उमेश घेवरीकर व उपाध्यक्ष भगवान राऊत यांनी ही माहिती दिली. परवा (शनिवार) नाटय़ परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.