स्त्री मुक्तीचा इतिहास जाणून घेऊन त्यांच्यातील अस्मिता जागृतीसाठी कार्य करण्याची गरज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे गाढे अभ्यासक डॉ. एम. एल. कासारे यांनी व्यक्त केली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यापीठ अनुदान आयोगांतर्गत सुरू करण्यात आलेल्या स्त्री अभ्यास केंद्राच्या ‘लिंग संवेदनशीलता’ या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे डॉ. कासारे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. व्ही. एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी तर स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालिका डॉ. शोभा शिंदे प्रमुख म्हणून उपस्थित होत्या. स्त्रियांवर होणाऱ्या हिंसाचारामागील कारणे व समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी स्त्री अभ्यास केंद्राने विशेष कार्यक्रम हाती घेण्याची अपेक्षा व्यक्त करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच स्त्री मुक्ती चळवळीतील महापुरुषांच्या कार्यावर त्यांनी या वेळी प्रकाशझोत टाकला. लिंग भेदभाव हा जागतिक स्तरावरील प्रश्न असल्याचे प्रा. माहेश्वरी यांनी नमूद केले. असमानता हीच स्त्रियांच्या राजकीय आणि आर्थिक शोषणाचा भाग असल्याचे समर्पक उदाहरणे देऊन त्यांनी स्पष्ट केले.
केंद्राच्या संचालिका डॉ. शोभा शिंदे यांनी प्रास्ताविकात केंद्र सुरू होण्यामागील भूमिका, उद्दिष्टे, विविध उपक्रम व कार्यक्रमाचा आढावा घेतला. डॉ. प्रतिभा ताकसांडे यांनीही स्त्रीविषयक विचार मांडले. सूत्रसंचालन प्रा. विश्रांती मुंजेवार यांनी केले. प्रा. विकास जाधव यांनी आभार मानले.

Ambedkari movement in the Bhil community Tribal woman and Dr Babasaheb Ambedkar
आदिवासी स्त्री आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Narendra Modi death threat
“जगभरात मोदींच्या हत्येचा कट”, भाजपाच्या नेत्याचं खळबळजनक विधान; म्हणाले, “मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर…”
What Navneet Rana Said?
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, “मला माझी मुलं रोज विचारायची, आई…”
Hindu Code Bill and Dr Babasaheb Ambedkar Marathi News
Hindu Code Bill: बाबासाहेबांचा राजीनामा; पंडित जवाहरलाल यांची भूमिका नक्की काय घडले होते?