सांगली महापालिकेच्या आयुक्तपदी अजिज कारचे यांची नियुक्ती झाली असून गेले साडेचार महिने प्रभारी आयुक्त म्हणून जिल्हाधिका-यांकडे कार्यभार होता. महापालिकेत सत्ताबदल झाल्यानंतर संजय देगांवकर यांची बदली झाल्यापासून महापालिकेला आयुक्त कोण मिळणार यावरून घोळ सुरू होता.
सांगलीच्या आयुक्तपदासाठी सुधाकर देशमुख, अच्युत हांगे यांच्या नावाची चर्चा होती. पुणे महापालिकेचे उपायुक्त सुधाकर देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र सेवाज्येष्ठतेचा मुद्दा पुढे येताच त्यांची नियुक्ती बारगळली. अखेर गुरुवारी सायंकाळी महापालिकेसाठी अजिज कारचे यांची नियुक्ती झाल्याचे आदेश प्राप्त झाले.
कारचे यांनी शासकीय सेवेत नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून कामकाजास सुरुवात केली. उल्हासनगर, मिराभाईंदर, परभणी या नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.  पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपायुक्त, परिवहन समितीचे सभापती, पुणे परिवहन महाप्राधिकरणाचे सहायक सरव्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केले आहे. दरम्यान आज कारचे यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली.

PSI Sanjay Sonawane, nagpur,
पीएसआय संजय सोनवणे म्हणतात, “मी पोलीस आयुक्तांना ओळखत नाही,” नेमका काय आहे प्रकार? जाणून घ्या…
ajit pawar ncp s mla, dilip mohite, collector office, amol kolhe, nomination form, shirur lok sabha constituency, lok sabha 2024, election 2024, shirur news, politics news, pune news,
खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या ‘टायमिंग’मुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Arvind kejriwal private secretary Bibhav Kumar
केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?
Mahayuti gathering in Washim, Gyayak Patni,
महायुतीचा मेळावा : मंत्री व पालकमंत्री उपस्थित अन् खुर्चीवरून वाद !