News Flash

बी. रघुनाथ जन्मशताब्दी;रविवारी परभणीत चर्चासत्र

कवी बी. रघुनाथ यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त मराठवाडा साहित्य परिषदेच्या परभणी शाखेतर्फे श्री शिवाजी महाविद्यालयात रविवारी (दि. २०) चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

| January 17, 2013 01:34 am

कवी बी. रघुनाथ यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त मराठवाडा साहित्य परिषदेच्या परभणी शाखेतर्फे श्री शिवाजी महाविद्यालयात रविवारी (दि. २०) चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते सकाळी १० वाजता चर्चासत्राचे उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले असतील. दुसऱ्या सत्रात उपाध्यक्ष प्रा. डॉ. दादा गोरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘बी. रघुनाथांची कथा’ यावर निबंधवाचन होणार आहे. प्रा. भास्कर चंदनशिव, पत्रकार आसाराम लोमटे व डॉ. रामचंद्र काळुंखे सहभागी होणार आहेत. तिसऱ्या सत्रात डॉ. बाळकृष्ण कवठेकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘बी. रघुनाथांची कविता’ यावर प्रा. इंद्रजित भालेराव, बी. रघुनाथांचे मराठी साहित्यातील स्थान यावर प्रा. लक्ष्मण तांबोळी निबंध सादर करणार आहेत. सायंकाळी साडेचार वाजता प्रा. मधू जामकर यांच्या उपस्थितीत चर्चासत्राचा समारोप होईल.
याप्रसंगी डॉ. कोत्तापल्ले यांचा महापौर प्रताप देशमुख यांच्या हस्ते परभणीकरांच्या वतीने सत्कार होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 1:34 am

Web Title: b ragunath conversation is on sunday
Next Stories
1 तलाठी संघातर्फे विविध ठिकाणी धरणे
2 जालनामध्येही धरणे आंदोलन
3 कासारखेडा शिवारातील मंदिराच्या कळसाची चोरी
Just Now!
X