आनंदवनातील अंध, अपंगांना मदत करण्यासाठी हरिओम सेवाभावी संस्थेतर्फे ६ जानेवारीला स्वरानंदवन वाद्यवृंद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच वेळी बाबा आमटे राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.
ज्येष्ठ पत्रकार मुरलीधर िशगोटे, जे. जे. रुग्णालय नेत्रचिकित्सा विभागप्रमुख डॉ. रागिनी पारीख, कवी इंद्रजित भालेराव, पुण्याचे पोलीस महानिरीक्षक संजय लाटकर, गायक पंडित फड, नूतन महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य दत्तात्रय कुलकर्णी, शिक्षक संघटनेचे नेते सय्यद रौफ कादरी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक धोंडिराम शेप यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमाचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. चंद्रपूर येथील महारोगी सेवा समितीचे प्रमुख डॉ. विकास आमटे, गडचिरोलीच्या लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक डॉ. प्रकाश आमटे, जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, आदर्श गाव प्रकल्प समिती कार्याध्यक्ष पोपटराव पवार, सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय सावरीकर आदींची उपस्थिती राहणार आहे. सोहळय़ास उपस्थित राहण्याचे आवाहन हरिओम मदत केंद्राचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब जाधव, सचिव अरुण झांबरे यांनी केले आहे.