उरण तालुक्यातील पावणेदोन लाख जनतेसाठी असणारे एकमेव ग्रामीण रुग्णालय विविध असुविधांमुळे सध्या आजारी असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
या रुग्णालयातील एक्स-रे यंत्रणा बंद आहे. इमारतीतील लोंबकळणारी वायिरग धोकादायक आहे. शौचालय आणि स्नानगृह अस्वच्छ आहेत. त्यामुळे येथील गोरगरीब जनतेला परवडत नसतानाही खाजगी रुग्णालयात महागडे उपचार घ्यावे लागत आहेत.
उरण तालुक्याची लोकसंख्या आता दोन लाखांवर पोहचली आहे. तीन वर्षांपूर्वी उरण नगरपालिकेने महाराष्ट्र शासनाकडे वर्ग केलेल्या रुग्णालयाचे इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय करण्यात आले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला होता. मात्र पुरेशी देखभाल, दुरुस्तीअभावी रुग्णालयास भग्न धर्मशाळेची अवकळा आली आहे.
पंख्यांची संख्या कमी असल्याने उकाडा आणि डासांमुळे बरे होण्यापेक्षा रुग्ण अधिक आजारी पडण्याचीच अधिक शक्यता आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महिला रुग्णांना अनेकदा पुरुषांच्या वॉर्डात ठेवले जाते.   
रुग्णांसाठी असलेले स्नानगृह अस्वच्छ आहे, तर दोनपकी एक शौचालय नेहमीच तुंबलेले असल्याने रुग्णालयात दरुगधी पसरलेली आहे. शौचालयातील दिवेही गायब आहेत.
वॉश बेसिनचे पाइप तुटल्याने घाण पाणी खाली सांडत आहे तर रुग्णालयातील गेलेल्या टय़ुब्स, विजेचे दिवे, तसेच वापरण्यात आलेल्या सीिरज आदींचा कचरा शौचालयाजवळ साठविण्यात येत आहे.
या रुग्णालयातील एक्स-रे यंत्रणा अनेकदा बंदच असल्याची रुग्णांची तक्रार आहे. रुग्णालयातील सोनोग्राफी यंत्र चालविण्यासाठी तंत्रज्ञ नसल्याने बंदच आहे. उरण तालुक्यातील भोम टाकी येथून आलेल्या अपंग प्रल्हाद पाटील गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा एक्स- रे काढण्यासाठी आले. मात्र काही उपयोग झाला नाही. आता त्यांना बाहेरून एक्स-रे काढा असे सांगण्यात आले आहे.