बदलापूर येथील एका मुलीवर खारघरमध्ये सदनिकेच्या कागदपत्राची चर्चा करण्याच्या बहाण्याने बलात्कार झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. पीडित मुलीने खारघर पोलीस ठाण्यात बदलापूर येथे राहणाऱ्या नाना बागूल याच्याविरोधात ही तक्रार केली आहे.
खारघरमधील सेक्टर-१५ येथील वास्तुविहार सोसायटीमधील के. एच. २ या इमारतीमध्ये हा प्रकार घडला. पीडित मुलगी नाना याला गेल्या काही महिन्यांपासून ओळखत होती. तिच्याजवळील मालमत्ता विकण्याच्या व्यवहारातून ही घटना घडल्याचे पोलिसांना पीडित मुलीने दिलेल्या जबाबातून स्पष्ट होते. नाना हा आरपीआय पक्षाचा पदाधिकारी असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणी खारघर पोलिसांचे पथक नाना बागूल याच्या शोधात आहे.