रेषांच्या फटकाऱ्यांनी मोठमोठय़ा राजकारण्यांना अन् सरकारलाही अंतर्मुख करायला लावणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आर. के. लक्ष्मण या दोन दिग्गजांची २५ नोव्हेंबर २०११ रोजी पुण्यात भेट झाली. आपल्या जुन्या मित्राला भेटण्यासाठी बाळासाहेब हे लक्ष्मण यांच्या औंध येथील निवासस्थानी आले होते. सुमारे तासभर मनमोकळ्या गप्पा मारत या मित्रांनी जुन्या
आठवणींना उजाळा दिला. लक्ष्मण यांनी त्या वेळी ‘कॉमन मॅन’चे चित्र रेखाटून ते बाळासाहेबांना भेट दिले.. बाळासाहेबांची ही पुणे शहरातील ही शेवटचीच भेट ठरली. (छायाचित्र सौजन्य- कैलास भिंगारे)

खासदार गजानन बाबर
मी १९७८ ला शिवसेनेचा पहिला नगरसेवक झालो, तेव्हापासून दोनदा आमदार व आता खासदार होईपर्यंतची सर्व पदे केवळ साहेबांमुळेच मिळाली. त्यांच्या निधनाने मराठी माणसाची खूपच हानी झाली आहे. शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेबांनी सामान्य माणसाला मोठे केले. स्वत: सत्तेबाहेर राहून शिवसैनिकांना पदे दिली. खुर्चीचा किंवा पदाचा हव्यास त्यांनी कधीच बाळगला नाही. मराठी माणसांवर प्रेम करणारा असा हा एकमेव नेता. त्यांच्यानंतर असा नेता होणे नाही.

Prime Minister Modi criticism of Rahul gandhi Lalu Prasad Yadav regarding meat
श्रावण महिन्यात मटणावर ताव; पंतप्रधान मोदी यांची राहुल-लालूप्रसाद यांच्यावर टीका
aam aadmi party AAP
आपचे खासदार संजय सिंह यांना मिळालेल्या जामिनाचे कारण काय? त्यांच्या वकिलांकडून नेमका काय युक्तिवाद करण्यात आला?
gulabrao patil
चावडी: बाळासाहेब भवन की ?
Delhi aap
आप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, भाजपाही केजरीवालांच्या राजीनाम्यावर ठाम; दिल्लीत सत्ताधारी-विरोधकांची निदर्शने!

 खासदार शिवाजीराव आढळराव
शिवसेनेत आल्यापासून बाळासाहेबांनी आपल्यावर मुलासारखे प्रेम केले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला आहे. बाळासाहेबांनी आपल्याला दोन वेळा खासदारकीची संधी दिली. पहिल्यांदा उमेदवारी देताना निवडून येशील, असा आत्मविश्वासही दिला होता. दूरदृष्टी असलेला असा लढाऊ नेता गेल्याने मराठी माणसाची मोठी हानी झाली आहे. त्यांनी शेवटपर्यंत महाराष्ट्राचे भले होण्यासाठी प्रयत्न केले.

 शि. द. फडणीस (ज्येष्ठ व्यंगचित्रकार)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये लोकशाही आहे की नाही हे मला सांगता येणार नाही. पण, त्यांनी निवडलेली व्यंगचित्राची भाषा मात्र, लोकशाहीचीच आहे. मतभेद दाखविण्यासाठी व्यंगचित्राइतकी अिहसक भाषा नाही. महाराष्ट्रामध्ये ही भाषा बाळासाहेबांनी रुजविली आणि ती महाराष्ट्राला समजलीदेखील. त्यामुळे अनेक व्यंगचित्रकार हे सकारात्मक अर्थाने बाळासाहेबांच्या शैलीच्या प्रभावाचे आहेत. आर. के. लक्ष्मण आणि बाळासाहेब हे दोघेही डेव्हिड लो यांना गुरुस्थानी मानत असल्यामुळे या दोघांच्याही व्यंगचित्रांमध्ये साम्य होते. व्यंगचित्रामध्ये तपशील नाही तर, आशय पाहायचा असतो याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. व्यंगचित्रांच्या माध्यमातून मी त्यांना ओळखत होतो. १९८३ मध्ये व्यंगचित्रकारांच्या संमेलनाचे बाळासाहेब अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांच्याभोवती सुरक्षेचे कुंपण नसल्यामुळे त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारता आल्या. व्यंगचित्रकार-संपादक झालेले शंवाकि यांच्यानंतर बाळासाहेब ठाकरे हे दुसरेच. व्यंगचित्रकारांने राजकीय नेतृत्व देण्याची ही देशातील एकमेव घटना असावी. एक चित्र म्हणजे एक हजार शब्द ही ताकद ठाकरे यांनी ओळखली होती. शब्दाचा संवाद संथ असतो. तर, व्यंगचित्राचा संवाद तात्काळ पोहोचतो आणि त्याची प्रखरतादेखील जास्त आहे.