’‘ब्लॅक रॉक’ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार
’‘ट्र लव्ह स्टोरी’ सवरेत्कृष्ट अ‍ॅनिमेशन पट
‘मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१४’मध्ये यंदा सवरेत्कृष्ट लघुपटासाठीचा सुवर्णशंख पुरस्कार बांगलादेशी दिग्दर्शकाच्या ‘आर यू लिसनिंग’ या लघुपटाने जिंकला. सात दिवस चाललेल्या या महोत्सवाचा सांगता समारोह मुंबईत रविवारी झाला. या वेळी चित्रपट निर्माते अदुर गोपालकृष्णन् आणि दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या हस्ते उत्कृष्ट माहितीपट, लघुपट आणि अ‍ॅनिमेशनपट यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
कमार अहमद सायमन या बांगलादेशमधील दिग्दर्शकाने पर्यावरणातील बदल, पर्यावरण संवर्धन यावर आधारित अनुभव ‘आर यू लिसनिंग’ या लघुपटाद्वारे मांडले. या ९० मिनिटांच्या लघुपटाला पाच लाख रुपयांचा सुवर्णशंख पुरस्कार जाहीर करण्यात आला. तर यंदाचा माहितीपटासाठीचा सुवर्णशंख पुरस्कार ‘इन बिटविन-इसांग युन इन नॉर्थ अ‍ॅण्ड साउथ कोरिया’ या माहितीपटाला मिळाला. दक्षिण व उत्तर कोरिया या दोन देशांत चाललेल्या संघर्षांचा परिणाम संगीतावर मात्र होत नाही, हे या माहितीपटाद्वारे दाखवण्यात आले.
तर एफटीआयआय निर्मित व विक्रांत पवार दिग्दर्शित ‘ब्लॅक रॉक’ उत्कृष्ट लघु फिक्शन चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तर सवरेत्कृष्ट अ‍ॅनिमेशन पटाचा पुरस्कार गीतांजली राव यांच्या ‘ट्र लव्ह स्टोरी’ या अ‍ॅनिमेशनपटाला देण्यात आला. तर यंदापासून सुरू करण्यात आलेला लोकप्रिय चित्रपट पुरस्कार यंदा ध्वनी देसाई यांच्या ‘चक्रव्यूह’ या चित्रपटाला घोषित झाला. माहितीच्या अधिकाराद्वारे भ्रष्टाचाराविरोधात कसा लढा देता येईल, हे या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. महोत्सवातील प्रतिनिधींनी आपली मते देऊन या चित्रपटाची निवड केली.