23 September 2020

News Flash

‘बँक ऑफ महाराष्ट्र’ ची हाँगकाँगमध्येही शाखा

नव्या वर्षांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचा परदेशातही विस्तार करण्यात येणार असून हाँगकाँगमध्ये बँकेची शाखा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र सिंग यांनी

| January 23, 2013 03:19 am

नव्या वर्षांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचा परदेशातही विस्तार करण्यात येणार असून हाँगकाँगमध्ये बँकेची शाखा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र सिंग यांनी दिली. येत्या काळात बँकेच्या विस्तारासाठी २०० कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक बाजारपेठेसाठी खुली करण्याची योजनाही बँक ऑफ महाराष्ट्रने आखली असल्याचे सिंग यांनी सांगितले.
नफ्यात ४३.१८ टक्के वाढ
बँक ऑफ महाराष्ट्रच्या निव्वळ नफ्यामध्ये तिसऱ्या तिमाहीमध्ये ४३.१८ टक्क्य़ांनी वाढ झाली असून नऊ महिन्यांमध्ये ३९.८१ टक्क्य़ांनी वाढ झाली असल्याचे बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र सिंग यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
निव्वळ व्याज उत्पन्नामध्ये वार्षिक तत्त्वावर १५.६४ टक्के वाढ दिसून आली. व्याजविरहित उत्पन्नामध्ये १३.२१ टक्क्य़ांनी वाढ झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2013 3:19 am

Web Title: bank of maharashtra branch in canada
Next Stories
1 राष्ट्रपती भवनातील पवित्र वनस्पती उद्यानाच्या निर्मितीची उलगडली कथा!
2 राज्याच्या दुर्गम भागातील दलित कवयित्रींवर माहितीपट
3 सावेडीतील नाटय़गृहासाठी साडेसात कोटींची निविदा
Just Now!
X