बनावट कागदपत्रांच्या आधारे महाराष्ट्र बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, अशा सहा कर्जदारांना ८ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. फसवणूक करून उचललेले कर्ज तत्काळ परत न केल्यास या कर्जदारांवर फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे बँक शाखाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.
शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतून कर्ज मंजूर करताना सहा कर्जदारांनी बनावट सात-बारा उतारे सादर केल्याचे उघडकीस आले. यानंतर या कर्जदारांना बँकेने नोटीस बजावताना कर्ज खाते बंद करण्याची तंबी दिली. यात रमेश अर्जुन सुर्वेशे (कुंभारी, तालुका व जिल्हा बीड), लता रमेश सुर्वेशे (कुंभारी, तालुका व जिल्हा बीड), गणेश अर्जुन सुर्वेशे (बीड), कौसाबाई धनराज फुलेल्लु, लताबाई धनराज फुलेल्लु, जिजाभाऊ कोंडीबा मजमुले यांचा समावेश आहे. आठ दिवसांत कर्ज परत केले नाही तर या कर्जदारांवर फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा बँकेने दिला.