स्थानिक सार्वजनिक वाचनालय, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई,नवमहाराष्ट्र युवा अभियान व महाराष्ट्र राज्य व तंत्रशिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षांनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय सुगम गीतगायन स्पर्धेत १००० रुपयाचे प्रथम पारितोषिक येथील नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या हेमलता बारापात्रे हिने व वक्तृत्व स्पर्धेत पी.एस.ए.महाविद्यालय पवनीचा संदीप एकनाथ गोस्वामी १००० रुपयाचे प्रथम पारितोषिक मिळाले.
स्थानिक सार्वजनिक वाचनालय, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई,नवमहाराष्ट्र युवा अभियान व महाराष्ट्र राज्य व तंत्रशिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षांनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धाचे उद्घाटन स्थानिक रेवाबेन पटेल महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.जुल्फी शेख यांनी केले. बक्षीस वितरण सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय दलाल यांच्या हस्ते झाले.सुगम गीतगायन स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे ७०० रुपयाचे पारितोषिक भाग्यश्री जोगेश्वर साठवणे या महिला अध्यापक विद्यालय भंडाराच्या विद्यार्थिनीने, तर तृतीय क्रमांकाचे ५०० रुपयाचे बक्षीस नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राची महादेवराव साटोने हिने मिळविले. वक्तृत्व स्पर्धेत नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयाची नेहा निलेश हटवार ७०० रुपयाचे द्वितीय, तर शासकीय अध्यापक महाविद्यालयाची प्रियंका भिवाजी कमाने ही ५०० रुपयाच्या तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली.  गीतगायन स्पर्धेच्या परीक्षक प्रा.प्रिया राजहंस व प्रा.आरती भालेराव होत्या, तर वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक प्रा.वामन तुरिले आणि विजय खंडेरा होते. दोन्ही स्पर्धेमधील पहिल्या दोन क्रमांकांच्या विजेत्यांची निवड विभागीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.  कार्यक्रमप्रसंगी सार्वजनिक वाचनालयाचे धनंजय दलाल, हर्षल मेश्राम, प्रा.वामन तुरिले यांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा.नरेश आंबिलकर, तर संचालन प्रा.आरती देशपांडे यांनी केले.
कार्यक्रमाचे संयोजक प्रा.गुणवंत काळबांडे होते. आभार नीळकंठ रणदिवे यांनी मानले.