News Flash

राजकीय वादातून एका कुटुंबाला मारहाण

राजकीय वादातून गोंधवणी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रवीण फरगडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे मारहाण करणारेही राष्ट्रवादीशी संबंधित आहेत.

| January 15, 2014 02:50 am

राजकीय वादातून गोंधवणी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रवीण फरगडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे मारहाण करणारेही राष्ट्रवादीशी संबंधित आहेत. भैरवनाथनगरच्या ग्रामपंचायत सदस्या दीपाली फरगडे व त्यांचे पती खादी ग्रामोद्योग संस्थेचे संचालक प्रवीण यांच्यासह २ महिलांना सोमवारी सायंकाळी मारहाण करण्यात आली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य व सेवा संस्थेच्या अध्यक्षाच्या मुलासह १५ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
खादी ग्रामोद्योग संस्थेचे संचालक प्रवीण बाबुराव फरगडे (वय ३५, रा. भैरवनाथनगर, ता. श्रीरामपूर) यांनी या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रवीण यांच्या पत्नी दीपाली या ग्रामपंचायत सदस्य व खादी ग्रामोद्योग संस्थेच्या संचालिका आहेत. आज सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हे पती-पत्नी, वडील व विमल फरगडे, मंदाबाई फरगडे या दोन चुलत्यांसह घरी बसले होते. याच वेळी भाऊराव बापूराव लबडे (रा. भैरवनाथनगर) हा इंडिका कारमध्ये आला. त्याच्यासमवेत आणखी १० ते १५ अज्ञात लोक मोटारसायकलवर आले. आमची चहाडी लावतोस का, असे म्हणत भाऊराव व त्याच्या साथीदारांना फरगडे कुटुंबीयांना मारहाण केली. शेजारच्या लोकांनी मध्यस्थी केल्यानंतर आरोपींनी पळ काढला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सर्व कुटुंबीय व फरगडे वस्तीवरील महिला भयभीत झाल्याचे प्रवीण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, आरोपी भाऊराव याची आई परिगाबाई लबडे या भैरवनाथनगर ग्रामपंचायतीमध्ये सदस्य आहेत, तर वडील बापूराव लबडे हे गोंधवणी विविध कार्यकारी सोसायटीमध्ये अध्यक्ष आहेत. प्रवीण फरगडे हेदेखील सोसायटीमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत. लबडे व फरगडे यांच्यात सोसायटीच्या कामकाजावरून तसेच गावपातळीवरील राजकारणात अनेकदा छोटय़ामोठय़ा कुरबुरी आहेत. त्याचेच पर्यवसान आजच्या मारामारीत झाले असल्याचे बोलले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2014 2:50 am

Web Title: beaten to a family in political dispute
टॅग : Beaten
Next Stories
1 रातराणीचा प्रवास स्वस्त
2 श्रीरामपूरला व्यापा-यांचा आज मोर्चा
3 टायरवालेंसह ८७ जणांची निर्दोष मुक्तता
Just Now!
X