25 November 2020

News Flash

बॅकस्टेज कलाकारांसाठी लवकरच ‘बेस्ट’ सेवा

० मढ जेट्टी व चित्रनगरीपासून रात्रीची बस ० भारतीय चित्रपट सेनेचे निवेदन गोरेगावची चित्रनगरी किंवा मढ आयलंड येथे मालिकांचे चित्रिकरण रात्री अपरात्री संपल्यानंतर किमान जवळच्या रेल्वे स्थानकापर्यंत

| April 27, 2013 01:49 am

० मढ जेट्टी व चित्रनगरीपासून रात्रीची बस
० भारतीय चित्रपट सेनेचे निवेदन
गोरेगावची चित्रनगरी किंवा मढ आयलंड येथे मालिकांचे चित्रिकरण रात्री अपरात्री संपल्यानंतर किमान जवळच्या रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठीही कोणतीच सोय नसलेल्या बॅकस्टेज कलाकारांठी आता लवकरच बेस्टची सेवा सुरू होणार आहे. मढ जेट्टी आणि गोरेगाव चित्रनगरी येथून दोन बसगाडय़ा किमान दादपर्यंत सोडाव्यात अशा मागणीचे पत्र भारतीय चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष सुबोध भावे यांनी बेस्ट समितीचे अध्यक्ष सुनील (नाना) आंबोले यांना गुरुवारी दिले. या बाबत लवकरच निर्णय घेऊन अशा प्रकारची बससेवा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन आंबोले यांनी दिल्याचे सुबोध भावे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
चित्रनगरी किंवा मढ येथे दुपारी दोन ते रात्री दोन या शिफ्टचे काम संपल्यानंतर बडे कलाकार व दिग्दर्शक वगैरे मंडळी आपल्या गाडय़ांनी घरी पोहोचतात. मात्र सर्व काम संपेपर्यंत सेटवर थांबणाऱ्या स्पॉटबॉय, लाइटमन अशा बॅकस्टेज कलाकारांना पहिल्या बसची वाट बघत थांबावे लागते. ही दोन्ही ठिकाणे रात्री निर्मनुष्य असतात. तसेच तेथे इतर कोणतीही सोय नाही. त्यामुळे या कलाकारांना किमान जवळच्या रेल्वे स्थानकापर्यंत जायला मिळावे, यासाठी बेस्टने एक गाडी रात्री अडीचच्या दरम्यान सोडावी, अशी मागणी ‘भाचिसे’ने या पत्राद्वारे केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2013 1:49 am

Web Title: best service to the back stage artist
टॅग Best,Service
Next Stories
1 प्रदीप शर्मा यांना न्यायालयाचे समन्स
2 येडात आपटले चित्रपट मराठी पाच!
3 ‘म्हाडा’च्याही घरांचे दर भिडले गगनाला!
Just Now!
X