ठाणे येथील समर्थ भारत व्यासपीठचे कार्यवाह भटू सावंत यांची ३ ते ७ डिसेंबरदरम्यान इंडोनेशियातील बाली शहरात होणारया विश्व व्यापार संघटनेच्या नवव्या मंत्री परिषदेसाठी सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे.  जगभरातील १५९ देशांचे वाणिज्य मंत्री व प्रशासकीय अधिकारी येथे उपस्थित राहणार आहेत.
३३ राष्ट्रांच्या कृषी अनुदानविषयक महत्त्वाच्या प्रस्तावांवर या परिषदेत चर्चा होणार आहे. त्यावर भारतातील अन्न सुरक्षा विधेयकाचे भवितव्य अवलंबून आहे. तसेच विविध देशांमध्ये व्यापार उदीम सुलभतेचा व्हावा, या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रस्तावही परिषदेत चर्चेत असणार आहेत. भारतातील लोकसभा निवडणूक व जगातील ढासाळलेल्या अर्थव्यवस्थेच्या पाश्र्वभूमीवर होत असलेल्या परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.