News Flash

बंधाऱ्यात पडली दुचाकी अन्..

तालुक्यातील तळोघ येथून चार दिवसांपूर्वी चोरीला गेलेली दुचाकी शेनवड बुद्रुक येथील लघुपाटबंधाऱ्यात मिळून आली आहे.

| January 2, 2015 01:18 am

तालुक्यातील तळोघ येथून चार दिवसांपूर्वी चोरीला गेलेली दुचाकी शेनवड बुद्रुक येथील लघुपाटबंधाऱ्यात मिळून आली आहे.
घोटीपासून जवळच असलेल्या शेनवड बुद्रुक येथील लघुपाटबंधाऱ्यात एक लाल रंगाची दुचाकी पूर्णपणे बुडाली असल्याचे रस्त्यावरून जाणाऱ्या शाळकरी मुलांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत पोलीस पाटील दत्तू कोकाटे यांना कळविले. ३१ डिसेंबर हा वर्षांचा अखेरचा दिवस असल्याने कोणी मद्यपी तोल जाऊन थेट गाडीसह बंधाऱ्यात पडला की काय किंवा कोणी घातपात करण्याच्या उद्देशाने ही दुचाकी पाण्यात टाकली काय, असा संशय त्यांच्या मनात बळावला. त्यांनी तत्काळ पोलिसांना यासंदर्भात माहिती दिल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक युवकांच्या मदतीने दुचाकी पाण्याबाहेर काढली. या दुचाकीच्या क्रमांकावरून ती तळोघ येथील एका युवकाची असून ही दुचाकी चार दिवसांपूर्वी चोरीला गेल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वानी सुटकेचा नि:श्वास टाकला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 1:18 am

Web Title: bike fell in dam
टॅग : Dam
Next Stories
1 बालगृहांचा प्रश्न युतीच्या राजवटीतही कायम
2 आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाचे वंदन
3 गगन नारंगच्या उपस्थितीत रविवारी ‘मविप्र मॅरेथॉन’
Just Now!
X