बेसुमार जंगलतोड आणि वाढत जाणारे सीमेंट काँक्रिटचे जंगल यामुळे शहरी विभागात पक्ष्यांचा किलबिलाट तसा दुर्मीळ होऊ लागला आहे. वाशी येथील राजीव गांधी जॉगिंग ट्रॅकवर ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन पक्ष्यांना साद घालण्याचा उपक्रम नुकताच राबविण्यात आला म्
 दुर्मीळ पक्ष्यांना साद घालण्यासाठी या ठिकाणी चबुतरा व चारापाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. वाशीमधील मिनी सिशोर या ठिकाणी राजीव गांधी जॉगिंग ट्रकवर सकाळ-संध्याकाळ अनेक जण फेरफटका मारण्यासाठी येत असतात. खाडीलगतची खारफुटी आणि धारण तलाव या दोघांच्या मधील रस्त्यांवर जॉगिंग ट्रॅक साकारण्यात आला आहे. या ठिकाणी नवी मुंबई पर्यावरण चॅरिटेबल ट्रस्ट व नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून शेकडो झाडांचे संवर्धन करण्यात आले आहे. या ठिकाणी झाडांना पाणी मिळावे यासाठी ठिकठिकाणी पाण्याची सोय करण्यात आली आहे.
वाशी येथील मिनी सोशार येथे नित्यनियमाने येणारे कोकिळा, कबूतर, डोमकावळा, घार, चिरक, चिमणी, पोपट, बगळा आदी पक्ष्यांचा वावर अधिक वाढावा यासाठी पक्षी निवारा, पिण्यासाठी पाणी, चारा चबुतरा बांधण्यात आला आहे.
तसेच या ठिकाणी पक्ष्यांची मराठी- इंग्रजी नावे, शास्त्रीय नावे त्याचप्रमाणे त्यांची लांबी आणि आकार यांबाबतची माहिती फलकांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. वाशी, नेरुळ, कोपरखरणे, पावणे, तुभ्रे आदी भागांतील नागरिक या ठिकाणी वॉकिंगसाठी येत असतात. जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला स्पीकर बसवण्यात आले असून त्या माध्यमातून नागरिकांना सुश्राव्य संगीत, भक्तिगीते, हिंदी- मराठी चित्रपटातील सुमधुर गीतांचा खजिना ऐकता येतो.