News Flash

वृद्धाश्रमात रंगले कवितेचे कुटुंब…!

‘कुटुंब रंगलंय काव्यात' या लोकप्रिय कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रा. विसुभाऊ बापट यांनी त्यांचा वाढदिवस यंदा अंबरनाथ तसेच डोंबिवली येथील वृद्धाश्रमात साधेपणाने साजरा केला.

| April 3, 2013 01:45 am

‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रा. विसुभाऊ बापट यांनी त्यांचा वाढदिवस यंदा अंबरनाथ तसेच डोंबिवली येथील वृद्धाश्रमात साधेपणाने साजरा केला. अशा रितीने कवितेचे हे चालते बोलते कुटुंब वाढदिवसाच्या दिवशी वृद्धाश्रमात रंगून गेले.  दरवर्षी प्रा. विसुभाऊ बापट १ एप्रिल हा आपला वाढदिवस निरनिराळ्या वृद्धाश्रमात साजरा करीत असतात. यंदा अंबरनाथ येथील कमलधाम वृद्धाश्रमास त्यांनी सहकुटुंब भेट दिली. येथील आजी-आजोबांची आस्थेने चौकशी करून त्यांनी त्यांचे आशिर्वाद घेतले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 1:45 am

Web Title: birthday celebration of visubhaue bapat
Next Stories
1 जकात नाके ओस, टोल नाक्यांवर रांगा
2 नवी मुंबईची वाटचाल बकालपणाकडे..
3 उपनगरीय रेल प्रवासी महासंघाच्या वतीने मंगळवारी स्वाक्षरी मोहीम
Just Now!
X