11 July 2020

News Flash

नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याने भाजप नगरसेविकेचा राजीनामा

भारतरत्न इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असून सार्वजनिक स्वच्छता वाढली आहे. या प्रश्नावर पालिका प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही या समस्या कायम

| February 26, 2014 03:40 am

भारतरत्न इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असून सार्वजनिक स्वच्छता वाढली आहे. या प्रश्नावर पालिका प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही या समस्या कायम राहिल्याने वैतागलेल्या भाजपच्या स्थानिक नगरसेविका मंगला पाताळे यांनी मंगळवारी महापालिकेच्या परिमंडळ कार्यालयात गांधीगिरी मार्गाने आंदोलन करीत ठिय्या मारला आणि पदाचा राजीनामाही दिला. मात्र प्रशासनाने लगेचच प्रलंबित समस्यांची सोडवणूक करण्याची हमी देताच हे आंदोलन मागे घेण्यात आले.
पालिका परिमंडळ कार्यालयात जाऊन नगरसेविका पाताळे यांनी आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसह तेथील अधिका-यांना पुष्पहार घालून सत्कार केला व तेथेच ठिय्या आंदोलन केले. प्रशासन काम करीत नाही आणि त्याविरोधात केलेल्या आंदोलनाची दखलही घेत नसेल तर नागरिक यापेक्षा आणखी काय करणार, असा सवाल उपस्थित करीत नगरसेविका पाताळे यांनी हतबलता दर्शविली. नागरी समस्यांची सोडवणूक होत नसल्यामुळे आपणास नगरसेवकपदावर काम करण्यास स्वारस्य नाही, असे सांगत पाताळे यांनी नगरसेवकाचा राजीनामा परिमंडळ अधिका-याकडे सादर केला. या वेळी झालेल्या आंदोलनात पालिकाविरोधी पक्षनेते कृष्णाहरि दुस्सा यांच्यासह भाजपचे नगरसेवक जगदीश पाटील, पांडुरंग दिड्डी, शिवानंद पाटील आदींचा सहभाग होता. मात्र अखेर प्रशासनाने आंदोलकांना सामोरे जात उद्या बुधवारपासून नागरी समस्यांची सोडवणूक करण्याची हमी दिली तेव्हा आंदोलन मागे घेण्यात आले व पाताळे यांनीही नगरसेवकपदाचा राजीनामा परत घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2014 3:40 am

Web Title: bjp corporators resignation for neglect of urban issues
टॅग Solapur
Next Stories
1 ठिबक सिंचन घोटाळय़ातील ५ आरोपींना अटकपूर्व जामीन
2 वाकचौरे यांनी काँग्रेसची चूक पदरात घेतली- मुख्यमंत्री
3 वृद्धेचा खून, उच्चशिक्षित महिलेला अटक
Just Now!
X