भाजप-शिवसेनेचे गेल्या २५ वषार्र्पासून असलेले सख्य संपुष्टात आले असले तरी महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून असलेला विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष भाजपसोबत राहणार असून त्यांनी दक्षिण नागपूरच्या जागेवर दावा केल्यामुळे भाजपच्या इच्छुकांनी बंडखोरीची तयारी चालविली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण नागपूर मतदारसंघ शिवसेनेकडे होता त्यामुळे भाजपचा उमेदवार या मतदारसंघात संधी मिळत नव्हती त्यामुळे भाजपमधील काही इच्छुक दावेदारांनी दावा केला होता. शिवसेनेशी असलेली युती संपुष्टात येताच दक्षिण नागपूरच्या भाजपच्या अनेक इच्छुक दावेदारांच्या अपेक्षा वाढलेल्या असताना त्या जागेवर शिवसंग्रामने दावा केला आहे. शिवसंग्रामचे नेते प्रमोद मानमोडे दक्षिण नागपूरमधून निवडणूक लढण्यास इच्छुक असून त्यांनी विनायक मेटे यांच्याकडे इच्छा व्यक्त केली. गेल्या आठवडय़ात दक्षिण नागपुरात विनायक मेटे यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला असता त्या मेळाव्यात मेटे यांनी दक्षिण नागपूर शिवसंग्रामकडे राहील, अशी घोषणा केली होती. त्यामुळे शिवसंग्राम कार्यकत्यार्ंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता दक्षिण नागपूरचा मार्ग मोकळा झाला असून त्या ठिकाणी शिवसंग्रामचे प्रमोद मानमोडे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळाली. प्रमोद मानमोडे हे निर्मल उज्ज्वल बँकेचे संस्थापक अध्यक्ष असून त्यांचे भाजपचे राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चांगले संबंध आहेत. लोकसभा निवडणुकीच्यावेळी मानमोडे यांना मदत केली होती. शिवसंग्रामला दक्षिण नागपूरची जागा देण्याचे निश्चित झाल्यामुळे दक्षिण नागपूरचे भाजपचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून त्यातील काहींनी तर बंडखोरी करण्याची तयारी सुरू केली आहे. दक्षिण नागपूरमधून भाजपकडून नगरसेवक छोटू भोयर यांचे नाव आघाडीवर असले तरी त्या ठिकाणी अशोक मानकर, सुधाकर कोहळे, रमेश सिंगारे आदी नेते स्पर्धेत आहेत.
या संदर्भात छोटू भोयर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, शिवसंग्रामने भाजपकडे दोन जागा मागितल्या असून त्यात दक्षिण नागपूरची आहे. आतापर्यंत शिवसेनेने या जागेवर दावा केला होता. अखेर युती संपुष्टात आल्याने भाजपला ही जागा मिळेल असे वाटत असताना शिवसंग्राने ही जागा मागितली आहे. या मतदारसंघावर भाजपची पकड असून शिवसंग्रामला ही जागा दिली तर पक्षातील कार्यकर्त्यांवर अन्याय होईल, असेही भोयर म्हणाले.