News Flash

बसप व मनसेचे विदर्भातील उमेदवार जाहीर

बहुजन समाज पक्षाने विदर्भातील उमेदवारांची तिसरी यादी पक्षाचे प्रदेश महासचिव सुरेश माने यांनी जाहीर केली आहे. पक्षाने यापूर्वी २६ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर उर्वरित मतदारसंघातील

| September 27, 2014 02:27 am

बहुजन समाज पक्षाने विदर्भातील उमेदवारांची तिसरी यादी पक्षाचे प्रदेश महासचिव सुरेश माने यांनी जाहीर केली आहे. पक्षाने यापूर्वी २६ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर उर्वरित मतदारसंघातील उमेदवार घोषित करण्यात आले.
चिखली मतदारसंघातून निवृत्ती जाधव, सिंदखेडराजा- वसंतराव मगर, मेहकर- साहेबराव खंडारे, मूर्तीजापूर- अरुण बोंद्रे, काटोल- सुधीर मेटांगळे, सावनेर- सुरेश डोंगरे, दक्षिण-पश्चिम नागपूर- इंजि. राजेंद्र पडोळे, मध्य नागपूर ओंकार अंजीकर, पश्चिम नागपूर- अहमद कादर, दक्षिण नागपूर- दिलीप रंगारी, कामठी- मो. हर्षल, रामटेक – विशेष फुटाणे, ब्रम्हपुरी- योगराज कुथे, वणी- राहुल खापर्डे, उमरखेड- नारायण पाईकराव, रिसोड- सुभाष देवळे पाटील, गोंदिया- मामा बनसोड, तिरोडा- दीपक हिरापुरे, अचलपूर – हाजी रफीक शेख, बडनेरा- रवींद्र वैद्य आणि गडचिरोलीमधून विलास खोडापे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून उद्या शनिवारी सर्व उमेदवार उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे माने यांनी सांगितले.  
मनसेची दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून त्यात बाळापूर मतदार संघातून प्रशांत लोठे, अकोला पूर्व- विनोद राऊत, वाशीम- ज्ञानेश्वर जाधव, अमरावती – अविनाश चौधरी, अचलपूर- प्रफुल्ल पाटील, मोर्शी- संजीव देशमुख, सावनेर- प्रमोद बोले, उमरेड- राजेश कांबळे, नागपूर पूर्व- कपिल आवारी, नागपूर उत्तर – रितेश मेश्राम, कामठी- विठ्ठल बावनकुळे, रामटेक- योगेश वाडीभस्मे, अर्जुनी मोरगाव – महेंद्र चंद्रिकापुरे, अहेरी – दिनेश मडावी, ब्रम्हपुरी- विश्वास देशमुख.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 2:27 am

Web Title: bjp mns declared candidate for vidarbha region
टॅग : Bsp,Mns
Next Stories
1 वन्यजीवांच्या व्यवस्थापनावर वन खात्याच्या समितीची बैठक
2 माजी मंत्री, नेत्यांच्या वारसदारांना उमेदवारी
3 विदर्भात नवरात्रोत्सव प्रारंभ
Just Now!
X