मूल तालुक्यातील भाजपचे प्राबल्य असलेल्या जुनासुर्ला येथील ग्रामपंचायतचे सरपंच विलास कलसार, उपसरपंच अजय खोब्रागडे, माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य कुशाल उपरीकर, सदस्य शंकर पात्रीकर, सदस्य मारोती एकेवार यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह जिल्हा काँग्रेस समितीच्या कार्यालयात काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
माजी खासदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष गजानन गावंडे, जिल्हा काँग्रेस समितीचे महासचिव नगरसेवक अशोक नागापुरे, जिल्हा परिषद सदस्य विनोद अहीरकर, पंचायत समितीचे सदस्य व माजी सभापती संजय मारकवार, ज्येष्ठ कार्यकर्ते विनायक बुग्गावार, शुक्राचार्य मद्रीवार, मारोती खोब्रागडे, गणेश खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होते.
या जिल्हय़ातील काँग्रेस ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वावर व कर्तृत्वावर विश्वास ठेवून जनकल्याणाची कामे करण्यासाठी सेवाभावी वृत्तीने काँग्रेसवर निष्ठा राखून पक्षात प्रवेश करीत आहोत. ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जनहितार्थ विकास कामे करीत राहू, असा दृढसंकल्प व्यक्त केला.