News Flash

विदर्भ-मराठवाडय़ावर अन्याय आढळून आल्यास अहवाल नाकारू – फडणवीस

केळकर समितीच्या अहवालात विदर्भ व मराठवाडय़ावर काही अन्यायकारक असल्याचे आढळून आल्यास हा अहवाल पूर्णत: नाकारला जावा, अशी भूमिका घेतली जाईल,

| December 4, 2013 01:59 am

विदर्भ-मराठवाडय़ावर अन्याय आढळून आल्यास अहवाल नाकारू – फडणवीस

केळकर समितीच्या अहवालात विदर्भ व मराठवाडय़ावर काही अन्यायकारक असल्याचे आढळून आल्यास हा अहवाल पूर्णत: नाकारला जावा, अशी भूमिका घेतली जाईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तालुका घटक मानून अनुशेष काढताना, तसेच विभागाचे अनुशेष काढताना काही अन्यायकारक असल्यास अहवाल नाकारला जावा, या साठी भाजपा प्रयत्न करेल. वेगवेगळ्या विषयांवरील अहवाल किमान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत, या साठी सरकारने पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
‘आदर्श’ च्या अहवालात बेअब्रू होईल म्हणून तो अहवालच दडपण्याचा प्रयत्न केला गेला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काहींना पाठीशी घालत आहेत. मात्र, या अनुषंगाने भाजपच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याने सरकारला हा अहवाल विधिमंडळ पटलावर ठेवण्यास आता न्यायालयच भाग पाडेल, असेही फडणवीस यांनी सांगितले. देशात छोटी राज्ये असावीत, अशीच भाजपची भूमिका आहे. त्यामुळे विदर्भात होणाऱ्या स्वतंत्र राज्याच्या मागणीला नेहमीच पािठबा आहे. लोकशाही पद्धतीने आंदोलन करून मागणी केल्यावर सरकारने लक्ष द्यावे, असे अपेक्षित आहे. हिंसक आंदोलन केल्यासच मागणी मान्य होते, असा पायंडा पडू लागला आहे. लोकशाही मार्गानेच भाजपने आत्तापर्यंत आंदोलन केले आहे. आता सरकारने नव्या आंदोलनास भाग पाडू नये, असेही फडणवीस म्हणाले.
या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला कोंडीत पकडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मुख्यमंत्री चव्हाण यांच्या पत्नीला मदत मिळते. केवळ त्याच तालुक्यात मदत दिली जाते, हे सारे चीड आणणारे आहे. वर्धा तालुक्यात काही शेतकऱ्यांना ८० रुपये, तर काहींना २२५ रुपये मदत सरकारने केली. पण ही दिलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टाच आहे, या विरोधात प्रामुख्याने आवाज उठवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पाणी लवादाच्या नव्या निर्णयामुळे मराठवाडय़ाच्या हक्काच्या २१ टीएमसी पाण्याचा प्रश्न पुन्हा लटकण्याची शक्यता असल्याचेही फडणवीस म्हणाले. येत्या २२ डिसेंबरला मुंबईत नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला मराठवाडय़ातून किमान एक लाख कार्यकत्रे यावेत, असे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2013 1:59 am

Web Title: bjp will reject kelkar committee report if unjustful for vidarbha marathwada
Next Stories
1 ‘स. भु.’तर्फे गोविंदभाई श्रॉफ संगीत महोत्सव प्रतिनिधी, औरंगाबाद
2 राज्य हौशी नाटय़ स्पर्धेत मराठवाडय़ाची मोहोर
3 प्रभाकर नळदुर्गकर यांचे दातृत्व; राहते घर भटके विमुक्त प्रतिष्ठानला
Just Now!
X