13 August 2020

News Flash

रक्तपेढीने गुणात्मक आणि संख्यात्मक विस्तार करावा!

ठाण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या कै. वामनराव ओक रक्तपेढीचा दर्जा चांगला आहे. व्यवस्था योग्य असून, स्वच्छतेवर भर दिला आहे.

| August 8, 2014 01:11 am

ठाण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या कै. वामनराव ओक रक्तपेढीचा दर्जा चांगला आहे. व्यवस्था योग्य असून, स्वच्छतेवर भर दिला आहे. रक्तपेढीची जागा पुरेशी आहे. या पाश्र्वभूमीवर आगामी काळात रक्तपेढीने गुणात्मक आणि संख्यात्मक विस्ताराचे धोरण आखून रक्त संकलनाचा वार्षिक आकडा वाढवावा. त्यासाठी रक्तदान शिबिरांची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावा, असे प्रतिपादन डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय ओक यांनी केले. कै. वामनराव ओक रक्तपेढीला विभागीय रक्त संक्रमण केंद्राची मान्यता मिळाल्याबद्दल एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन ठाण्यातील नौपाडा परिसरातील गोखले सभागृहात करण्यात आले होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून संजय ओक उपस्थित होते. गरजूंना वाजवी किमतीत रक्त उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. डायलिसिस रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रक्तपेढीने साधारण सहा बेड्सचे डायलिसिस युनिट सुरू करावे. स्टेमसेल बँक हा आधुनिक वैज्ञानिक संशोधनाचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. भविष्यात याचे महत्त्व वाढणार आहे. मात्र स्टेमसेल बँक ही महागडी प्रक्रिया आहे. रक्तपेढीने ही सुविधा उपलब्ध करून देण्याचाही विचार करावा असे ओक यांनी सांगितले. या वेळी स्वयंस्फूर्तीने अधिकाधिक रक्ताचे संकलन करणाऱ्या संयोजकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर रक्तपेढीचे उपाध्यक्ष डॉ. राजीव निक्ते, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप हुद्देदार, कार्यवाह अतुल धर्मे उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2014 1:11 am

Web Title: blood bank need qualitative and numerical growth says vice chancellor dr sanjay oak
Next Stories
1 तरुणांनी पडद्यामागचे जग समजून घ्यावे;अभिनेता मंगेश सातपुते यांचे प्रतिपादन
2 मार्केट ओस.. फेरीवाले भरघोस
3 ग्रंथालयालाही टपऱ्यांचा वेढा
Just Now!
X