कुलाब्यापासून दहिसर, मुलुंडपर्यंत पसरलेल्या अवाढव्य शहराचा कारभार पाहणाऱ्या पालिकेतील बहुतांश खात्यातील योजनांचे खर्चही तसेच अवाढव्य असतात. पालिकेचा घनकचरा विभाग तसेच इतर विभागांमध्ये लागणाऱ्या साबणांचेही तसेच आहे. या वर्षी पालिकेने तब्बल चार कोटी रुपयांचे २२ लाख साबण खरेदी करण्याचे ठरवले आहे.शहरातील स्वच्छता व कचऱ्याचे व्यवस्थापन ही पालिकेच्या प्रमुख जबाबदाऱ्यांपकी एक. यासाठी पालिकेकडे सुमारे ३२ हजार सफाई कामगार आहेत. त्यातील २८ हजार पालिकेचे कर्मचारी तर इतर कंत्राटी पद्धतीने काम करतात. शहराच्या स्वच्छतेसोबत या कामगारांच्या वैयक्तिक स्वच्छतेसाठी साबणाची आवश्यकता असते आणि त्यासाठी पालिका दरवर्षी साबणाची तरतूद करत असते. या वर्षी पालिकेने ऑगस्टमध्ये मागवलेल्या ब्रॅण्डेड साबणाच्या निविदेला फक्त दोनच कंपन्यांनी प्रतिसाद दिला. पुनíनविदा काढूनही प्रतिसाद न लाभल्याने अखेर जानेवारी महिन्यात या साबण खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीत सादर करण्यात आला. कर्नाटक सोप्स अ‍ॅण्ड डिर्टजट पावडर लिमिटेड या कंपनीकडून ही साबण खरेदी केली जाणार असून टॉयलेट, वॉिशग व काबरेलिक अशा तीन प्रकारच्या साबणांचे तब्बल २२ लाख नग पालिकेने मागवले आहेत. यासाठी ३ कोटी ८६ लाख रुपये खर्च येणार आहे.