मुंबई शहर आणि उपनगरातील नालेसफाईचे काम ९९.९१ टक्के पूर्ण झाले असल्याचा दावा पालिकेने केला आहे. पालिकेने शहरातील मुख्य आणि अन्य लहान नाल्यांची ९९.७८ टक्के, पर्जन्य जलवाहिन्यांची ९९.९४ टक्के, पूर्व उपनगरातील ९९.८८ टक्के आणि पश्चिम उपनगरात शंभर टक्के नालेसफाई झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. तसेच मिठी नदी पात्रातील शहर हद्दीतील ९९.६७ टक्के गाळ तर पूर्व उपनगरातील १०० टक्के गाळ काढला असल्याचेही पालिकेचे म्हणणे आहे. दरम्यान नालेसफाई कामाच्या अंतर्गत रेल्वे मार्गातील नाले यांचाही समावेश असतो. मात्र हार्बर रेल्वे मार्गावरील चेंबूर, गोवंडी आणि मध्य रेल्वेवर विद्याविहार ते छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यान केवळ माटुंगा -दादर भाग वगळता अन्य ठिकाणच्या नाल्यांची पूर्ण सफाई झालेली नसल्याचे सांगण्यात येते.