‘मिलिबग्स’च्या प्रादुर्भावाने मुंबईतील मरणासन्न अवस्थेमध्ये पडलेल्या पर्जन्यवृक्षांना तोडून टाकण्याऐवजी त्यांना रंगवून त्यांच्या संवर्धनासाठी ‘ब्रिंग टू लाइफ’ या उपक्रमांतर्गत मुंबई महानगरपालिकेने पर्जन्यवृक्षांना रंगवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
मुंबईतील कित्येक पर्जन्यवृक्ष मिलिबग्सच्या प्रादुर्भावाने मेली आहेत. त्यांना कापून टाकण्याचा एकमेव मार्ग पालिकेकडे असतो. पण या वृक्षांना कापून टाकण्यापेक्षा त्यांना आकर्षक रंगसंगतीमध्ये रंगवून त्यांचे संवर्धन करण्याचे काम पालिकेतील मनसेचे गटप्रमुख संदीप देशपांडे यांनी हाती घेतले आहे. किडय़ांच्या प्रादुभार्वाने शिवाजी पार्कमधील मेलेले हे झाड निरुपयोगी झाले होते. तरी स्थानिकांच्या आठवणी मात्र या झाडामध्ये गुंतल्या होत्या. त्यामुळे स्थानिकांच्या मदतीने झाडाला रंगविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. विविध ठिकाणी विद्रूप झालेल्या भिंतींवर कल्पकपणे चित्रे काढून त्यांना स्ट्रीट आर्टचे स्वरूप देण्यात येते.
त्याच धर्तीवर या वृक्षांनाही स्ट्रीट आर्टचे स्वरूप देऊन त्यांना देखणं स्वरूप देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात आला. यासाठी अ‍ॅक्रेलिक रंगांचा वापर केला असून रंग टिकवून ठेवण्यासाठी मेलामिनचाही वापर करण्यात आला आहे. यासाठी लागणारा खर्च आजूबाजूच्या परिसरातील कंपन्यांनी सामाजिक बांधीलकी जपत स्वत:हून उचलला. त्यामुळे पालिकेला या उपक्रमासाठी एक पैसाही खर्च करण्याची गरज भासली नाही. यापुढे माहीम ते प्रभादेवी पट्टय़ातील मेलेले सुमारे ४० वृक्ष रंगविण्याचा देशपांडे यांचा मानस आहे. पण त्यासाठी ४०,००० ते ५०,००० रुपयांपर्यंतचा खर्च येऊ शकतो. त्यासाठीही लोकांनी स्वत:हून पुढे येऊन मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
श्श्श्श… वाघोंबांची तलावामध्ये सुरू आहे पूल पार्टी; ‘ठंडा ठंडा कुल कुल’मुळे बाहेर निघायलाच तयार नाही
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!