25 September 2020

News Flash

गोंदिया जिल्ह्य़ात बोगस बियाण्यांची सर्रास विक्री

शेतीच्या उत्पादनात वाढ व्हावी, याकरिता नामांकित बियाण्यांची चढय़ा भावात खरेदी केल्यानंतरही ती बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची प्रकरणे जिल्ह्य़ात उघडकीस आली आहेत.

| October 1, 2013 10:08 am

शेतीच्या उत्पादनात वाढ व्हावी, याकरिता नामांकित बियाण्यांची चढय़ा भावात खरेदी केल्यानंतरही ती बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची प्रकरणे जिल्ह्य़ात उघडकीस आली आहेत. विशेष म्हणजे, कंपनी संचालकांकडून शेतकऱ्यांना ‘मॅनेज’ करण्याचे प्रयत्न होत असले तरी जिल्हा कृषी सभापतींनी अधिकाऱ्यांना यासंबंधात कडक निर्देश दिल्याने मात्र त्यांची पंचाईत झाली आहे.
शेतकऱ्यांना उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्याने संकटाला सामोरे जावे लागत आहे. नेहमीच त्यांच्या नशिबी उपेक्षितांचे जीवन वाटय़ाला आले आहे. गेली दोन वष्रे दुष्काळाला सामोरे जावे लागत असल्याने यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी ‘रायिझग’ कंपनीचे ‘बलवान’, तर यशोदा कंपनीचे ‘जय श्रीराम’ या धानाच्या बियाण्याची लागवड केली. यावर्षी अतिवृष्टीने चांगलेच झोडपून काढल्याने अनेकांची शेती खरडून गेली. तरीही अशा परिस्थितीत जे काही पीक हाती येण्याची अपेक्षा होती ती या बोगस बियाण्यांमुळे मात्र धुळीस मिळाल्याचे दिसत आहे. ‘रायिझग’ कंपनीचे ‘बलवान’, तर यशोदा कंपनीचे ‘जय श्रीराम’ हे बियाणे १२० ते १३० दिवसांच्या कालावधीचे म्हणून शेतकऱ्यांनी लावले. मात्र, या जातीचे धान फक्त ७० ते ८० दिवसात फुटू लागल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सडक अर्जुनी, सालेकसा, गोरेगाव, गोंदिया या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात या कंपनीचे धान लावले असता ते पूर्णत: फुटले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून त्यांनी यासंबंधात तक्रारही केली आहे.
शेतकरी असलेले कांबळे यांनी याप्रकरणाची तक्रार वरिष्ठ पातळीपर्यंत केली असली तरी त्याची दखल अजूनही घेण्यात आली नाही. विशेष म्हणजे, गोरेगाव तालुक्यातील सर्वाटोला येथील डॉ. चौधरी यांनी ८ बॅग धान बियाणे विकत घेऊन शेतात टाकले. मात्र, ते उगवलेच नसल्याने त्यांना मोठा आíथक फटका सहन करावा लागला. सालेकसा तालुक्यात १५ ते २० शेतकऱ्यांना असा आíथक फटका सहन करावा लागला आहे. ‘रायिझग’ व ‘यशोदा’ कंपनीच्या नावावर बनावट बियाणे तयार करण्याचा कारखाना वडय़ा येथे असल्याचे बोलले जाते. या कंपनीशी पाटील व नाकाडे नावाचे इसम संबंधित असून तेच या प्रकरणात सहभागी असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे, ज्या शेतकऱ्यांची तक्रार असेल त्याच्याशी संपर्क साधून त्याला थोडेफार आíथक प्रलोभन देऊन तक्रार न देण्यास बाध्य केले जात असल्याचीही चर्चा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2013 10:08 am

Web Title: bogus seed sale in gondia district
Next Stories
1 गोंदिया जिल्ह्य़ातील २५०० कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित
2 जुन्याच अटीवर प्रकल्प झाल्यास अकोला मनपाचे सुमारे २५० कोटींचे नुकसान
3 केदारनाथचा प्रलय मानवाने निसर्गात केलेल्या हस्तक्षेपामुळे- डॉ. यशवंत काठपातळ
Just Now!
X