News Flash

औंढा नागनाथ बस स्थानकात बॉम्बची अफवा

औंढा नागनाथ बस स्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये (एमचएच१४-बीटी००५७) बॉम्ब असल्याची अफवा उडाल्याने प्रवाशांची धावपळ झाली. औंढा पोलिसांनी बसमधील त्या खोक्याची तपासणी केली असता तो रिकामा

| March 17, 2013 12:07 pm

औंढा नागनाथ बस स्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये (एमचएच१४-बीटी००५७) बॉम्ब असल्याची अफवा उडाल्याने प्रवाशांची धावपळ झाली. औंढा पोलिसांनी बसमधील त्या खोक्याची तपासणी केली असता तो रिकामा निघाल्याने सर्वानीच नि:श्वास सोडला.
औंढा नागनाथ बस स्थानकात दुपारी तीनच्या सुमारास औंढा-चोंढी-वसमत जाणारी बस उभी होती. त्या बसमध्ये एक खोके होते. त्यामध्ये बॉम्ब असल्याची अफवा सुरू होताच काही क्षणात बसमधील प्रवासी खाली उतरून सैरावैरा पळत सुटले. प्रवासी का पळतात याची विचारणा केल्यावर बसमध्ये बॉम्ब असल्याचे सांगितल्यावर प्रत्येक जण पळू लागल्याने एकच धांदल उडाली. औंढा पोलीस ठाण्याचे कर्मचारी बस स्थानकात पोहोचले व त्यांनी त्या खोक्याची तपासणी केली असता ते रिकामेच निघाल्याने पोलिसांसह प्रवाशांनी नि:श्वास सोडला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 12:07 pm

Web Title: bomb rumer in aundha nagnath bus stand
Next Stories
1 जालन्यात टँकर फेऱ्यांसाठी ‘जीपीएस’ यंत्रणा वापरणार
2 निसर्ग मित्र मंडळाच्या वतीने आजपासून भूजल अभियान
3 चैतन्यमहाराज देगलूरकर यांचे आज व्याख्यान
Just Now!
X