29 September 2020

News Flash

वकिलांचा कामावर बहिष्कार

चंदिगड व जयपूर येथे झालेल्या वकिलांवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी नगरमधील वकिलांनी आज पूर्ण दिवस न्यायालयीन कामकाजात भाग घेतला नाही. न्यायालयासमोरील आजच्या सर्व सुनावण्यांवर पुढील

| March 11, 2013 07:44 am

चंदिगड व जयपूर येथे झालेल्या वकिलांवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी नगरमधील वकिलांनी आज पूर्ण  दिवस न्यायालयीन कामकाजात भाग घेतला नाही. न्यायालयासमोरील आजच्या सर्व सुनावण्यांवर पुढील तारीख देण्याची विनंती करणारे अर्जही पक्षकारांनीच सादर केले.
बार कौन्सिल ऑफ इंडिया व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रने दिल्ली वगळता सर्व वकिल संघटनांना आज कामकाजात सहभागी न होण्याच्या सूचना  दिल्या होत्या. त्यानुसार शहर वकिल संघटनेचे अध्यक्ष शिवाजी कराळे, मंगेश दिवाणे, अनिल सरोदे, सुधीर बाफना, राजेंद्र सेलोत, युवराज पाटील, भाऊसाहेब घुले आदींनी प्रधान जिल्हा न्यायाधिशांना कामकाजात सहभागी होणार नसल्याचे निवेदन दिले. तसेच सर्व न्यायाधिशांची भेट घेऊन संघटनेच्या निर्णयांची माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 11, 2013 7:44 am

Web Title: boycott on work by advocates
टॅग Boycott
Next Stories
1 अतिक्रमण विरोधी मोहिमेच्या निषेधार्थ राशिनला रास्ता रोको
2 रस्ता रुंदीकरण मागणीसाठी मोर्चा
3 विनाअनुदान शाळांचे निकष बदलले जात नसल्यामुळे आत्मदहनाचा इशारा
Just Now!
X