वसईतील शालट्रोन िपटो या चौथीतील विद्यार्थ्यांने आपल्या प्रतिभेच्या जोरावर थेट राष्ट्रीय स्तरावर वैज्ञानिक संकल्पनेचा झेंडा फडकावला. देशभरातून सर्वोत्तम तरूण वैज्ञानिकाचा शोध घेणाऱ्या ‘ब्रेनकॅफे बिडग सायण्टिस्ट कॉन्टेस्ट’ २०१३-१४ मध्ये त्याने ‘ब’ गटामध्ये पहिला क्रमांक पटकाविला आहे.
चौथीत शिकणाऱ्या िपटोने पावसाळ्यात वाहात जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी अनोखा प्रयोग साकारला आहे. त्याने पाणी शुद्ध करण्यासाठी अ‍ॅल्युमिनियम सल्फेटचा वापर केला आणि पाणी शुद्ध केले. या पाण्याचा वापर स्वच्छतागृहांमध्ये करता येऊ शकतो, असे िपटो सांगतो. त्याच्या या संकल्पनेचा वापर त्याची वसईतील शाळा एसकेसीमध्ये सुरू करण्यात आला आहे. शाळेच्या स्वच्छतागृहांमध्ये िपटोच्या प्रयोगानुसार पाणी स्वच्छ करून वापरले जाते. स्पध्रेतही िपटोने अवघ्या दोन मिनिटांमध्ये मातीयुक्त पाणी स्वच्छ करून दाखविले होते.
ही स्पर्धा गेले चार महिने भारतातील १३ राज्ये व ३०० शाळांमध्ये सुरू असून यामध्ये ८६०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये झालेल्या अंतिम फेरीची सांगता पाच श्रेणीतील १५ विजेत्यांच्या घोषणेने झाली. प्रत्येक श्रेणीमध्ये पाच विद्यार्थ्यांनी आघाडीचे स्थान मिळवले आणि प्रत्येकी पाच लाख रुपयांचे रोख बक्षीस जिंकले. प्रत्येक श्रेणीतील उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांनी दोन लाख रुपयांचे बक्षीस जिंकले. पहिली ते दहावीतील एकूण ४५ विद्यार्थ्यांनी अंतिम फेरीत त्यांचे नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. वाय. एस. राजन, अणुशास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जयरामन, नेहरू तारांगणचे संचालक डॉ. अरिवद परांजपे व मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्सचे डॉ. पारुल शेठ यांनी स्पध्रेचे परीक्षण केले. कल्पनेतील वेगळेपण (प्रकल्प इतरांपेक्षा किती वेगळा वा कल्पक आहे), शास्त्रीय तत्त्व किंवा संकल्पना, वापरलेले साहित्य, साहित्याचे सुलभीकरण, त्याची उपयुक्तता आदी निकषांवर या स्पध्रेचे मूल्यमापन करण्यात आले.